Coronavirus: जंगलातल्या आगीसारखा पसरणार नवा व्हेरिएंट; कोरोना लस न घेणाऱ्यांनी राहा सतर्क, अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 09:52 AM2021-08-05T09:52:44+5:302021-08-05T09:54:53+5:30
जो कोरोना लसीचा प्रभाव शून्य ठरवेल आणि जंगलातील आगीप्रमाणे व्हायरस पसरण्यासाठी कारणीभूत ठरेल असा दावा या रिपोर्टमधून तज्ज्ञांनी केला आहे
वॉश्गिंटन – भारतात कहर माजवणारा कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट(Delta Variant) आता अमेरिकेत मोठ्या वेगाने पसरत आहे. त्याशिवाय अल्फा, बीटा व्हेरिएंटदेखील आहेत. अर्जेंटिना आणि चिलीमध्ये लांब्डा व्हेरिएंटही लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांवर संकट निर्माण करत आहे. आता येणाऱ्या काळात कोरोना व्हायरसचं असा व्हेरिएंटनं येणार असून तो या सर्वांपेक्षा अधिक धोकादायक असणार आहे असा रिपोर्ट समोर आला आहे.
जंगलातील आगीप्रमाणं हा व्हेरिएंट पसरणार
न्यूजवीक रिपोर्टनुसार, अशा कुठल्याही व्हेरिएंटची अपेक्षा कमी आहे परंतु हे अशक्यदेखील नाही. कोरोना व्हायरसचा असा व्हेरिएंट येण्याची शक्यता आहे. जो कोरोना लसीचा प्रभाव शून्य ठरवेल आणि जंगलातील आगीप्रमाणे व्हायरस पसरण्यासाठी कारणीभूत ठरेल असा दावा या रिपोर्टमधून तज्ज्ञांनी केला आहे. भीती ही आहे की, हा व्हेरिएंट संक्रमित लोकांच्या जुन्या आकडेवारीचे सर्व रेकॉर्ड्स मोडून टाकेल.
कोरोना लसीचा परिणाम नाही
सिडार्स-सिनाई मेडिकल सेंटरमध्ये डायरेक्टर ऑफ मॉलिक्युलर पॅथोलॉजीचे संचालक एरिक वेल यांच्या म्हणण्याप्रमाणे, डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक संक्रमित व्हेरिएंट येणं कठीण आहे. कदाचित येणाऱ्या काळात असा व्हेरिएंट येऊ शकतो जो वेगाने लोकांना संक्रमित करेल. या नव्या व्हेरिएंटचं म्यूटेशनमुळे स्पाइक प्रोटीन बदललं तर कोरोना लसीचा प्रभाव नष्ट होईल. सर्वाधिक लसी स्पाइक प्रोटीनला टार्गेट करतात आणि व्हायरसला न्यूट्रलाइज करतात.
लस न घेतलेल्यांना मोठा धोका
रिपोर्टमध्ये इशारा देण्यात आला आहे की, मोठ्या संख्येने लोकांनी लस घेण्यापासून नकार दिल्यानं ते कोविड १९ म्यूटेशन लॅब बनतील. डेल्टा व्हेरिएंटचं संक्रमण पाहता आगामी काही महिन्यांमध्ये यापेक्षा धोकादायक व्हेरिएंट येऊ शकतो. यूनवर्सिटी ऑफ मिशिगनचे चीफ हेल्थ ऑफिसर आणि इन्फेक्शियस डिजीज रिसर्चर प्रीती मलानी यांनी सांगितले की, आता फक्त मास्क घालणं आणि सोशल डिस्टेंसिंगनं कोरोना व्हायरसपासून बचाव करणं कठीण आहे. या समस्येवर लस समाधान आहे परंतु ती न घेणाऱ्यांमुळे एक मोठी बाधा उभी राहू शकते.