Coronavirus : लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणाऱ्याला पोलिसांनी दिली अनोखी शिक्षा, Video पाहून कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 09:29 AM2020-04-20T09:29:40+5:302020-04-20T09:41:09+5:30

Coronavirus : पंतप्रधानांनी लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग पाळण्यास सांगितलं आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी गर्दीचे चित्र पाहायला मिळत आहे.

Coronavirus video arogyasetu app police try new ways keep people home SSS | Coronavirus : लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणाऱ्याला पोलिसांनी दिली अनोखी शिक्षा, Video पाहून कराल कौतुक

Coronavirus : लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणाऱ्याला पोलिसांनी दिली अनोखी शिक्षा, Video पाहून कराल कौतुक

googlenewsNext

नवी दिल्ली - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. भारतात सध्याची स्थिती पाहता 3 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 15,000 च्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 500 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पंतप्रधानांनी लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग पाळण्यास सांगितलं आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी गर्दीचे चित्र पाहायला मिळत आहे. लोक विनाकारण लॉकडाऊनमध्येही घराबाहेर पडत आहे. लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणाऱ्याला पोलिसांनी एक अनोखी शिक्षा दिल्याची घटना समोर आली आहे.

लॉकडाऊनमध्ये एक जण बाईकवरून घराबाहेर पडला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला. पोलिसांनी बाजूला घेत त्याला एक भन्नाट अशी शिक्षा दिली. या शिक्षेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून सर्वत्र पोलिसांचं कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये ही घटना घडली आहे. काही लोक सध्या कारण नसताना घराबाहेर पडत आहेत. अशीच एक व्यक्ती बाईकवरून बाहेर पडल्यावर पोलिसांनी त्याला शिक्षा केली. वाराणसीतील एका चौकात पोलिसांनी एका बाईकस्वाराला पकडलं तेव्हा त्याला आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करायला लावलं. 

उत्तर प्रदेश पोलिसांनी बाईकस्वाराला फक्त एवढंच नाही तर हे अ‍ॅप आणखी तीन जणांना डाऊनलोड करायला सांग त्याशिवाय सोडणार नाही अशी अटही घातली. उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या अनोख्या शिक्षेचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. ट्विटरवर एका युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये पोलिसांनी बाईकस्वाराला पकडल्यावर तुझी बाईक जप्त करतो असं सांगितलं. तेव्हा तो पोलिसांसमोर हात जोडत असून त्यांना समजवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. युजरने हा व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केला असून उत्तर प्रदेश पोलिसांचा अनोखा अंदाज म्हणत या अभिनव शिक्षेबद्दल काय सांगाल असं विचारलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोना रोखण्यासाठी सरकारने लोकांना आरोग्य सेतू अ‍ॅपचा वापर कऱण्यास सांगितलं आहे. देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. सरकारने 'आरोग्य सेतू' नावाचं एक नवं अ‍ॅप लाँच केलं आहे. कोरोनाविरोधातील लढाईत लोकांना आरोग्य सेवांशी जोडणे आणि सर्वसामान्यांमध्ये सुरक्षितता निर्माण करणे हा या अ‍ॅपचा मुख्य उद्देश आहे. आरोग्य सेतू हे कॉम्प्रिहेन्सीव्ह कोविड-19 ट्रॅकिंग अ‍ॅप असून ब्लूटूथ आणि जीपीएसचा वापर करतं. जीपीआरद्वारे व्यक्तीचं रिअल टाईम लोकेशन ट्रॅक करण्यात येतं. त्यामुळे  हे अ‍ॅप गर्दीच्या ठिकाणी एखादा कोरोनाबाधित असल्यास युजर्सना सतर्क करणार आहे. अ‍ॅपद्वारे शासनाकडे नोंद असलेला कोरोनाग्रस्त व्यक्तीजवळ आल्यास हे अ‍ॅप ट्रॅक करणार आहे. सहा फूट अंतरापर्यंत हे अ‍ॅप ‘त्या’ व्यक्तीला ट्रॅक करू शकतं. केंद्र सरकारकडे असलेल्या डेटाबेसचा अ‍ॅक्सेस या अ‍ॅपला मिळणार आहे. केंद्रातर्फे लिंकचे मॅसेज देण्यात येत असून या लिंकद्वारेही हे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करता येतं.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : कोरोनाची लक्षणे असलेल्या पतीला 4 रुग्णालयांनी नाकारलं, पत्नीने घरीच केले उपचार अन्...

CoronaVirus: आजपासून लॉकडाऊनच्या नियमांमध्ये बदल; थोडी सूट, काही निर्बंध

CoronaVirus: ग्रीन, ऑरेंज झोनमधील नागरिकांना आजपासून दिलासा; जाणून घ्या काय बंद, काय सुरू

 

Web Title: Coronavirus video arogyasetu app police try new ways keep people home SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.