Coronavirus : कोरोना हेल्मेट पाहिलंत का?, जनजागृतीसाठी 'त्याने' लढवली अनोखी शक्कल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 11:50 AM2020-04-04T11:50:51+5:302020-04-04T11:58:22+5:30
Coronavirus : एका तरुणाने कोरोनाबाबत अनोख्या पद्धतीने जनजागृती करून लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीने सांगत मोदींनी लोकांना जेथे आहात तेथेच राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी लॉकडाऊनचे तीन तेरा वाजल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. प्रशासनान सातत्याने सूचना देऊन देखील लोक अनेक ठिकाणी गर्दी करत आहेत. याच दरम्यान एका तरुणाने अनोख्या पद्धतीने जनजागृती केली आहे.
उत्तर प्रदेशातील एका तरुणाने कोरोनाबाबत अनोख्या पद्धतीने जनजागृती करून लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आपल्या भन्नाट थीमने त्याने लोकांना घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. विशेष पाल असं या तरुणाचं नाव असून तो एक सामाजिक कार्यकर्ता आहे. विशेषने कोरोना व्हायरसचे एक हटके हेल्मेट घालून रस्त्यावर जनजागृती केली आहे. कोरोनाचे हेल्मेट घालून हातात फलक घेऊन त्याने लोकांना घराबाहेर पडू नका, काळजी घ्या असं आवाहन केलं आहे. याआधी काही दिवसांपूर्वी चेन्नईतील एका व्यक्तीने कोरोनाची प्रतिकृती असलेलं एक हेल्मेट तयार करून जनजागृती केली होती.
Moradabad: Vishesh Pal, a social worker, wears a #coronavirus-themed helmet & appeals to people who are out on the streets to stay at home, during the lockdown imposed to prevent spread of the disease. He says, "I appeal to people to stay at home to ensure safety of everyone". pic.twitter.com/vxGcqT45Cp
— ANI UP (@ANINewsUP) April 4, 2020
भारतात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या 2,567 वर पोहोचली आहे; तर, आतापर्यंत 72 जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 10 लाखांच्या वर पोहोचला आहे. तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग आता जगातील 200 हून देशात झाला आहे. भारतात ही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरातील रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असून अनेक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहेत. भारतातील रुग्णालयात बेडची संख्या कमी आहे. कोरोनाग्रस्तांवर योग्य उपचार करता यावेत यासाठी काही स्टेडियम आणि हॉटेल्सचं रुपांतर हे क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्यात आले आहे.
Coronavirus : हॉटेलपासून ट्रेनपर्यंत देशातील 'या' ठिकाणांचं होणार क्वारंटाईन सेंटरमध्ये रूपांतरhttps://t.co/kVyU8HLjzX#coronaupdatesindia#coronavirusindia
— Lokmat (@MiLOKMAT) April 4, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताला मोठं यश; व्हायरसला हरवण्यासाठी तयार केली लस!
Coronavirus : धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने दाम्पत्याची आत्महत्या, पोस्टमार्टम करण्यास डॉक्टरचा नकार
Coronavirus : हॉटेलपासून ट्रेनपर्यंत देशातील 'या' ठिकाणांचं होणार क्वारंटाईन सेंटरमध्ये रूपांतर
Jammu And Kashmir : कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा
coronavirus : इटली, स्पेननंतर अमेरिकेत कोरोनाचा प्रकोप, एका दिवसात गेले इतके बळी