मोदींनी 6 वर्षांत जेवढे 'कमावले', तेवढे महिनाभरात गमावले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 12:29 PM2020-03-24T12:29:58+5:302020-03-24T15:50:54+5:30

Corona Virus india मोदींनी पदभार स्वीकारला तेव्हा सेन्सेक्स २४७१६ वर बंद झाला होता. गेल्या सहा वर्षांत २० जानेवारी २०२० ला सेन्सेक्स आता पर्यंतच्या उच्चांकावर म्हणजेच 42273 वर गेला होता.

Coronavirus whatever earned in narendra modi's era share market lost it hrb | मोदींनी 6 वर्षांत जेवढे 'कमावले', तेवढे महिनाभरात गमावले

मोदींनी 6 वर्षांत जेवढे 'कमावले', तेवढे महिनाभरात गमावले

Next

नवी दिल्ली : जगभरात कोरोना संक्रमणाची लाट सुरु आहे. काही काळापूर्वी मोदींची लाट सुरू होती. होय, कारणही तसेच आहे. नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ ला पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. लोकांना त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. यामुळे त्यांनी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काही ऐतिहासिक निर्णयही घेतले. या निर्णयांचा परिणाम असा झाला की अर्थव्यवस्थेबरोबरच शेअर बाजारातही जोर दिसू लागला. देशात गुंतवणूकदारांचा महापूर आला, मात्र कोरोनाच्या लाटेने मोदींची लाट कमकुवत केली आणि त्यांच्याद्वारे सहा वर्षांत झालेली वाढ काही दिवसांत वाहून गेली. 


मोदींनी पदभार स्वीकारला तेव्हा सेन्सेक्स २४७१६ वर बंद झाला होता. गेल्या सहा वर्षांत २० जानेवारी २०२० ला सेन्सेक्स आता पर्यंतच्या उच्चांकावर म्हणजेच 42273 वर गेला होता. मात्र, काल ३९३४ अंकांची ऐतिहासिक घसरण झाली आणि सेन्सेक्स २५९८१ वर बंद झाला. सोमवारी यामध्ये १३.१५ टक्क्यांची घट नोंदविली गेली. गेल्या काही दिवसांपासून सेन्सेक्समध्ये मोठी घसरण सुरू आहे. 

केवळ मार्च महिन्यातच सेन्सेक्स १२३१६ अंकांनी घसरला आहे. सोमवारी बाजार उघडताच पहिल्या तासाभरातच गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी रुपये बुडाले. यावेळी सेन्सेक्स ३००० पेक्षा जास्त अंकांनी घसरला होता. 


मार्चमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी १ लाख कोटी काढून घेतले आहेत. शेअर विक्री कमालीची वाढल्याने शेअर तज्ज्ञांनाही याचे आकलन करणे कठीण झाले आहे. देशात कोरोनाचा दुसरा टप्पा सुरू असून पूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यावरून शेअर बाजारही पुढील काळात आणखी खाली जाण्याची चिन्हे आहेत. शेअर बाजारातील ब्रोकरही पहिल्यांदा वर्क फ्रॉम होम करत आहेत. 


गुंतवणूकदारांचे ५२ लाख कोटी बुडाले
जानेवारीमध्ये जेव्हा बाजार उच्चस्थानी होता तेव्हा बीएसई लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य १५९.२८ लाख कोटी होते. १३ मार्चला ३८ कामकाज दिवसांमध्ये हे घटून ११३.४९ लाख कोटींवर पोहोचले. म्हणजेच या काळात ४६ लाख कोटी रुपये बुडाले. आतापर्यंत हा आकडा ५२ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. 

Web Title: Coronavirus whatever earned in narendra modi's era share market lost it hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.