CoronaVirus: 27 एप्रिलला कोरोना लढाईची पुढची दिशा ठरणार?; पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 12:48 PM2020-04-22T12:48:46+5:302020-04-22T13:50:26+5:30
मोदींच्या घोषणेनुसार महाराष्ट्रासह ज्या नऊ राज्यांनी याधीच ‘लॉकडाऊन’ ३० एप्रिलपर्यंत सुरु ठेवायचे ठरविले होते तेथेही आता ३ मेपर्यंत ‘लॉकडाउन’ लांबला आहे
मुंबई - कोरोना साथीला आळा घालण्यासाठी आतापर्यंत योजलेल्या उपायांना बऱ्यापैकी यश आले असले तरी अजूनही नवे संसर्ग व नवे मृत्यू होतच आहेत. त्यामुळे काबूत येत असलेल्या या साथीला पुन्हा डोके वर काढायला जराही वाव मिळी नये यासाठी देशव्यापी ‘लॉकडाउन’ येत्या ३ मेपर्यंत वाढविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. यापुढे प्रत्येक मृत्यू व प्रत्येक संसर्ग रोखणे हेच उद्दिष्ट असल्याने ‘लॉकडाउन’चे निर्बंध अधक कडक केले जातील, असेही मोदींनी जाहीर केले. त्यानंतर, दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा आज आठवा दिवस आहे. त्यामुळे पुढील रणनिती काय, यासाठी पंतप्रधान मोदींनी सर्वच राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत तेथील राज्यांच्या परिस्थितीचा आढावा ते घेणार आहेत.
मोदींच्या घोषणेनुसार महाराष्ट्रासह ज्या नऊ राज्यांनी याधीच ‘लॉकडाऊन’ ३० एप्रिलपर्यंत सुरु ठेवायचे ठरविले होते तेथेही आता ३ मेपर्यंत ‘लॉकडाउन’ लांबला आहे. अशा प्रदीर्घ ‘लॉकडाउन’मुळे देशाला मोठी आर्थिक किंमत मोजावी लागत आहे. पण संकटात असलेल्या लोकांच्या जीवांपुढे ही किंमत काहीच नाही, असेही मोदींनी म्हटले होते. देशात २० एप्रिलनंतर निंर्बंध थोडेफोर शिथिल करण्यात आल्याचे दिसून येत आहे. ‘लॉकडाउन’चे किती कसोशीने पालन केले व कोरोनाला आळा घालण्यात किती यश आले याचे प्रत्येक राज्य-जिल्हा-गाव-शहरनिहाय मूल्यपान होईल. जे यात पास होतील, जे ‘हॉटस्पॉट’ वर्गात नसतील व जेथे नव्या ‘हॉटस्पॉट’ची शक्यता नसेल तिथे काही व्यवहार सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आता, कोरोनाविरुद्धची पुढील लढाई कशी? याबाबत नवी रणनिती ठरविण्यात येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढील रणनिती ठरविण्यासाठी 27 एप्रिल रोजी देशातील सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. या बैठकीत पुढील दिशा ठरणार असून लॉकडाऊन कालावधीवरही चर्चा होणार आहे. याबाबचे पत्र, पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहे. त्यानुसार, मोदींसोबतच्या या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह सर्वच राज्यांचे गृहमंत्री, आरोग्यमंत्री, मुख्य सचिव, गृहसचिव, आरोग्य विभागाचे सचिव आणि राज्याचे पोलीस महासंचालक उपस्थित राहावे, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, लॉकडाऊनचा पहिला टप्पा पूर्ण होण्यापूर्वीही मोदींनी सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे संवाद साधला होता.
आणखी वाचा...
लॉकडाऊनमुळे नरेंद्र मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर; ट्रम्प संकटात
एड्स, स्वाईन फ्ल्यू अमेरिकेतून पसरला; कोणी जबाबदार धरले का? चीनचा सवाल
फेसबुक-Reliance Jioचा 'मेगा प्लॅन'; तीन कोटी दुकानदार, शेतकरी होणार मालामाल
हास्यास्पद! पाकिस्तानात ६० वर्षांचा वृद्ध 'गर्भवती'; खासगी लॅब सील करण्याची वेळ