CoronaVirus एक छदामही देणार नाही! निकृष्ट टेस्टिंग किटवरून भारताने चीनला सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 03:20 PM2020-04-24T15:20:21+5:302020-04-24T15:23:01+5:30
CoronaVirus चीनने भारतीय बाजारातील घसरगुंडी पाहून संधीचे सोने करण्यासाठी पैसा ओतायला सुरुवात केली होती. मात्र, मोदी सरकारने यावर रोख लावली आहे. आत खराब टेस्टिंग किटवरून वातावरण तापलेले असताना चीनच्या पुरवठादार कंपन्यांनी यावर खुलासा केला आहे.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरस जगभर पसरविणाऱ्या चीनने आता जगभरातील देशांसोबत फसवणुकीचे धंदे सुरु केले असून भारताला तब्बल साडे सहा लाख खराब गुणवत्तेच्या टेस्टिंग किट पाठविल्या आहेत. दोन राज्यांनी आक्षेप घेतल्यानंतर आयसीएमआरनेही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून आता मोदी सरकार अॅक्शनमध्ये आले आहे.
चीननेभारतीय बाजारातील घसरगुंडी पाहून संधीचे सोने करण्यासाठी पैसा ओतायला सुरुवात केली होती. मात्र, मोदी सरकारने यावर रोख लावली आहे. आत खराब टेस्टिंग किटवरून वातावरण तापलेले असताना चीनच्या पुरवठादार कंपन्यांनी यावर खुलासा केला आहे. चीनची कंपनी गुआंगजौ वोन्डफो बायोटेक आणि झुवाई लिवजोन डायग्नोस्टिक्स इंक या दोन कंपन्यांना या रॅपिड टेस्टिंग किटचा पुरवठा केला होता. या कंपन्यांनी भारताचा दावा फेटाळून लावताना म्हटले की आम्ही गुणवत्ता तपासूनच किट निर्यात करतो. गुणवत्ता आमच्यासाठी प्राथमिकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तर भारताने यावर कडक भूमिका घेतली असून चीनकडून आलेली पाच लाख रॅपिड टेस्टिंग किट परत चीनला परत केली जाणार असल्याचे भारत सरकारकडून सांगण्यात आले आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितली आहे. शुक्रवारी राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे ते बोलत होते. तसेच या देशाला किटची कोणतीही रक्कम देण्यात येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. अन्य काही देशांकडूनही किट मागविण्यात आली होती.
राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये या किटवर प्रश्नचिन्ह लावण्यात आले होते. सुरुवातीला राजस्थानमध्ये १२०० लोकांची चाचणी करण्यात आली होती. यामध्ये केवळ दोघांचेच अहवाल पॉझिटिव्ह आले होते. या किट्सची अॅकयुरेसी ९० टक्के असायला हवी होती. ती केवळ ५ टक्के आहे. यामुळे देशभरातून चीनने फसवल्याची भावना निर्माण झाली होती.
आणखी बातम्या...
चीनला किंमत मोजावीच लागेल! जगाला वेदना दिल्या, माणसे गमावली; अमेरिकेची धमकी
CoronaVirus कोरोनाचे बुमरँग! न्यूयॉर्कहून व्हायरस घुसल्याने चीनचे दुसरे 'वुहान' लॉकडाऊन
अमेरिकेने वाळीत टाकले, चीनने WHO साठी अख्खी तिजोरीच खुली केली
सावधान! आता पीएफ अॅडव्हान्स काढाल तर 10 वर्षांनी पस्तावाल
मुलगा झाला म्हणून अख्ख्या पंचक्रोशीत बत्ताशे, लाडू वाटले; निघाला कोरोना पॉझिटिव्ह
विखारी पाकिस्तान! भारताविरोधात मोठ्या सायबर युद्धाला सुरुवात
कोरोनाचे दुष्परिणाम; तब्बल २५ कोटी बळी जाण्याची भीती