Coronavirus: राज्यात पुन्हा निर्बंध लागणार? देशात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचं महाराष्ट्रासह पाच राज्यांना पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 09:43 AM2022-04-20T09:43:22+5:302022-04-20T09:43:50+5:30

Coronavirus: वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारी म्हणून महाराष्ट्रासह पाच राज्यांना पत्र लिहून सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या महिन्याच्या सुरुवातीलाच निर्बंधमुक्त झालेल्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे निर्बंध लागण्याची शक्यता आहे.

Coronavirus: Will there be new restrictions in the state? Centre's letter to five states including Maharashtra on the backdrop of growing corona in the country | Coronavirus: राज्यात पुन्हा निर्बंध लागणार? देशात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचं महाराष्ट्रासह पाच राज्यांना पत्र 

Coronavirus: राज्यात पुन्हा निर्बंध लागणार? देशात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचं महाराष्ट्रासह पाच राज्यांना पत्र 

Next

नवी दिल्ली - देशामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहे. दिल्लीमध्ये परिस्थिती चिंताजनक असून, गेल्या २४ तासांत येथे कोरोना रुग्णसंख्येत २६ टक्के वाढ दिसून आली आहे. दिल्लीमध्ये मंगळवारी कोरोनाच्या ६३२ नव्या रुग्णांची नोंद झाली. उत्तर प्रदेशमध्येही कोरोनाची रुग्णसंख्या वाढताना दिसत असून, येथे २४ तासांत १६३ नवे रुग्ण सापडले आहेत. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारी म्हणून महाराष्ट्रासह पाच राज्यांना पत्र लिहून सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या महिन्याच्या सुरुवातीलाच निर्बंधमुक्त झालेल्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे निर्बंध लागण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र आणि मिझोराम या राज्यांचा पत्र लिहून काही सूचना दिल्या आहे. केंद्राने या राज्यांना कोरोनाच्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याचे आणि आवश्यकता भासल्यास संसर्ग पसरण्यापासून रोखण्यासाठी सर्व आवश्यक ती पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे. देशामध्ये यावेळी सर्वाधिक कोरोना रुग्ण हे दिल्लीमध्ये सापडत आहेत. येथे पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र आणि दिल्लीसह एकूण पाच राज्यांना कोरोनाविरोधात फाइव्ह फोल्ड रणनीती वापरण्याची सूचना केली आहे. यामध्ये टेस्ट, ट्रेक, ट्रीट, व्हॅक्सिनेशन आणि कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य करण्यास सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रामध्येही मंगळवारी कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसले. मंगळवारी महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे १३७ रुग्ण सापडले. तर एक दिवस आधी हा आकडा ५९ एवढा होता. गेल्या आठवडाभरात महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे ६९३ रुग्ण सापडले आहेत. 

Read in English

Web Title: Coronavirus: Will there be new restrictions in the state? Centre's letter to five states including Maharashtra on the backdrop of growing corona in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.