CoronaVirus: तिसरी लाट खरंच धोकादायक ठरणार? जागतिक आरोग्य संघटना आणि एम्सन केला असा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 09:25 AM2021-07-05T09:25:16+5:302021-07-05T09:25:33+5:30

जागतिक आरोग्य संघटना आणि एम्स यांनी ४५०० लोकांच्या डेटाचा अभ्यास केल्यानंतर तिसऱ्या लाटेबाबत भाष्य केले.

CoronaVirus: Will the third wave really be dangerous? The World Health Organization and Emson claim | CoronaVirus: तिसरी लाट खरंच धोकादायक ठरणार? जागतिक आरोग्य संघटना आणि एम्सन केला असा दावा

CoronaVirus: तिसरी लाट खरंच धोकादायक ठरणार? जागतिक आरोग्य संघटना आणि एम्सन केला असा दावा

Next

कोरोनाची दुसरी लाट आता ओसरल्यात जमा आहे. मात्र, अजूनही काही ठिकाणी तिचा प्रभाव टिकून आहे. त्यातच डेल्टा प्लस या कोरोनाच्या नव्या अवताराने डोके वर काढले आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट निर्माण होण्याचा धोका असल्याचे बोलले जात आहे. खरंच तिसरी लाट येणार आहे का, आल्यास ती किती आणि कोणासाठी धोकादायक असेल, याची चर्चा होणे गरजेचे आहे. 

ऑक्टोबरमध्ये येणार तिसरी लाट रॉयटर्स या संस्थेचा दावा 
रॉयटर्सने दाव्याच्या पुष्टीसाठी ३ ते १७ जून या कालावधीत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञमंडळी, डॉक्टर्स, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, साथरोग तज्ज्ञ इत्यादींशी चर्चा केली, त्यांची मते जाणून घेतली.
- या सगळ्यांनी भारतात कोरोनाची तिसरी लाट १०० टक्के येणार असल्याचे सांगितले.
- त्यातील ८५ टक्के लोकांनी तिसरी लाट ऑक्टोबर महिन्यातच येईल, असा दावा केला. 
- मात्र, दुसऱ्या लाटेप्रमाणे तिसरी लाट तितकीशी भयंकर नसेल, 
असे अनेकांचे म्हणणे पडले.
- लसीकरण आणि औषधे 
यांमुळे तिसऱ्या लाटेचा धोका जास्त नसेल, असा दावा सर्व तज्ज्ञांनी केला. 
- १८ वर्षे वयाखालील मुलांसाठी लस उपलब्ध नसल्याने मुलांना तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे काही जणांना वाटते. 

तिसऱ्या लाटेचा धोका मुलांना कमीच, जागतिक आरोग्य संघटना आणि एम्स यांचा दावा -
- भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका मुलांपेक्षा ज्येष्ठांनाच अधिक असल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटना आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) यांनी एका सर्वेक्षणाच्या आधारावर केला आहे.
- जागतिक आरोग्य संघटना आणि एम्स यांनी ४५०० लोकांच्या डेटाचा अभ्यास केल्यानंतर तिसऱ्या लाटेबाबत भाष्य केले.
- देशातील काही भागांमध्ये मुलांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्याने तिसऱ्या लाटेचा धोका लहानग्यांपेक्षा मोठ्यांना वा ज्येष्ठांना अधिक असेल, असे या दोन्ही संस्थांचे म्हणणे आहे.

६५% लोकांना लहान मुले तसेच १८ वर्षे वयाखालील मुलांना तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे वाटते.
 ३५% तज्ज्ञांना असा कोणताही धोका मुलांना नसल्याचे वाटते.

महाराष्ट्रात तिसरी लाट भयंकर असेल कोविड टास्क फोर्स
- महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सने तिसरी लाट महाराष्ट्रासाठी भयंकर असेल असा दावा केला आहे. 
- तिसऱ्या लाटेचा उच्चांक प्रतिदिन ८ लाख कोरोनाबाधित असा असेल, असेही टास्क फोर्सचे म्हणणे आहे.
- त्यांनी सर्वेक्षण आणि विश्लेषण यांच्या आधारावर हे भाकीत केले आहे. 
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत पाच लाख मुलांना संसर्ग होईल, असेही फोर्सचे म्हणणे आहे. 
- डेल्टा प्लसचे बाधितही महाराष्ट्रात आढळून आले आहेत. 
- तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. कोविड 
- केंद्रे मोठ्या संख्येने उभारण्यात आली आहेत.
 

Web Title: CoronaVirus: Will the third wave really be dangerous? The World Health Organization and Emson claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.