coronavirus : उत्तर प्रदेशातील मजूर वर्षभर कामावर न फिरकण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 03:50 AM2020-04-27T03:50:37+5:302020-04-27T03:50:49+5:30

हे मजूर कामाच्या ठिकाणी लगेचच परत न आल्यास महाराष्ट्र व इतर काही राज्यांतील औद्योगिक क्षेत्रांमध्ये मनुष्यबळाच्या कमतरतेची मोठी समस्या उभी राहू शकते.

coronavirus :  Workers in Uttar Pradesh may not return to work for a year | coronavirus : उत्तर प्रदेशातील मजूर वर्षभर कामावर न फिरकण्याची शक्यता

coronavirus : उत्तर प्रदेशातील मजूर वर्षभर कामावर न फिरकण्याची शक्यता

Next

लखनऊ : उत्तर प्रदेशातून देशभरात रोजीरोटी कमाविण्यासाठी गेलेल्या ५ लाख, ३० हजार स्थलांतरित मजुरांना लॉकडाऊनच्या काळात राज्यात परत आणून त्यांचे पुनवर्सन करण्याची योजना योगी आदित्यनाथ सरकार आखत आहे. हे मजूर आठ महिने ते वर्षभरापर्यंत आपल्या कामाच्या ठिकाणी परत जाण्यास उत्सुकनसतील असे गृहित धरूनच ही योजना राबविण्यात येईल. हे मजूर कामाच्या ठिकाणी लगेचच परत न आल्यास महाराष्ट्र व इतर काही राज्यांतील औद्योगिक क्षेत्रांमध्ये मनुष्यबळाच्या कमतरतेची मोठी समस्या उभी राहू शकते.
उत्तर प्रदेशमधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, अपुºया मजुरांअभावी अनेक कंपन्यांची, प्रकल्पांची कामे खोळंबू शकतात. देशभरातील ५,३०००० स्थलांतरित मजुरांना उत्तर प्रदेशमध्ये परत आणून त्यांचे पुर्नवसन करण्यासाठी योजना आखण्याकरिता उत्तर प्रदेश सरकारने पाच सदस्यांची एक समिती नेमली आहे.
>उद्योगधंदा सुरू करण्यासाठी मदत
बिगरकुशल कामगारांना जर त्यांची इच्छा असेल तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत कामे सोपविली जातील. या कामगारांनी स्वत:चा उद्योगधंदा सुरू करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार मदत करेल, असे त्या राज्यातील एका ज्येष्ठ अधिकाºयाने सांगितले.

Web Title: coronavirus :  Workers in Uttar Pradesh may not return to work for a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.