CoronaVirus: चिंताजनक! अवघ्या २४ तासांत वाढले २२९३ रुग्ण, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ३७ हजारांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 09:42 AM2020-05-02T09:42:11+5:302020-05-02T09:51:05+5:30
लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिगच्या अंमलबजावणीनंतरही देशातील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या तब्बल २२९३ रुग्णांचे निदान झाले आहे.
नवी दिल्ली - सुमारे दीड महिन्यापासून सुरू असलेले लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिगच्या अंमलबजावणीनंतरही देशातील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या तब्बल २२९३ रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ३७ हजार ३३६ झाली आहे. दरम्यान, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन १७ मेपर्यंत वाढवण्यात आले आहे.
आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत २ हजार २९३ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर या २४ तासांत देशभरात ७१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज सकापर्यंत देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३७ हजार ३३६ पर्यंत पोहोचली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे देशभरात आतापर्यंत ९ हजार ९५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांची टक्केवारी २६.६४ टक्क्यांवर पोहोचली आहे.
2293 new cases, 71 deaths in the last 24 hours; this is the highest number of cases reported in one day: Ministry of Health and Family Welfare https://t.co/kd8KWQJgY2
— ANI (@ANI) May 2, 2020
दरम्यान, देशभर लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला आहे. तिसऱ्या टप्प्यात ४ ते १७ मे दरम्यान लॉकडाऊन कायम असेल. मात्र रेड, ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये विभागणी करून जनजीवन सुरळीत करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवी मार्गदर्शिका प्रसिद्ध करत रहिवाशांना सूट दिली आहे. ग्रीन झोनमधील प्रमुख आर्थिक व्यवहारांना परवानगी देताना रेड झोनमध्ये मात्र निर्बंध वाढवले आहेत. फिजिकल डिस्टन्सिंग, चेह-यावर मास्क असणे मात्र देशभरात बंधनकारक असेल. मुंबई, पुणे व दिल्ली रेड झोनमध्ये असल्याने तेथील नागरिकांना कोणताही दिलासा मिळणार नाही. रुग्णसंख्या कमी होत जाण्यासाठी तिसऱ्यांदा लॉकडाउन वाढवल्याची माहिती गृह मंत्रालयाने दिली. २१ एप्रिलला जारी केलेल्या मार्गदर्शिकेमुळे अनेक दुकाने उघडली होती. ग्रामीण भागातील व्यवहार पूर्वपदावर येत होते.
महत्त्वाच्या बातम्या
पाकिस्तानची आगळीक, नियंत्रण रेषेवरील गोळीबारात दोन जवान शहीद, चार नागरिक जखमी
CoronaVirus News: सवलतींसह वाढला लॉकडाऊन, १७ मे आता नवीन तारीख
CoronaVirus News: राज्यातील १०० टक्के जनतेला मोफत उपचार मिळणार