coronavirus: अरे व्वा! इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्याने तयार केली एसी पीपीई किट, असं करते काम...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 04:56 PM2020-08-16T16:56:04+5:302020-08-16T17:04:43+5:30

पीपीई किट काढल्यानंतर पूर्णपणे थकून गेलेले आणि घामाने डबडबलेल्या डॉक्टरांचे फोटो तुम्ही पाहिलेच असतील. मात्र पीपीई किटमुळे डॉक्टर आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांना होणारा त्रास आता कमी होण्याची शक्यता आहे.

coronavirus: Wow! An AC PPE kit created by an engineering student works like this ... | coronavirus: अरे व्वा! इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्याने तयार केली एसी पीपीई किट, असं करते काम...

coronavirus: अरे व्वा! इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्याने तयार केली एसी पीपीई किट, असं करते काम...

Next
ठळक मुद्देसंपूर्णपणे सीलबंद असणाऱ्या पीपीई किटमध्ये एसी फिट करण्याची अजब कल्पना एका अवलिया संशोधकाने शोधून काढली आहेजबलपूरमधील एका युवकाने ही एअरकंडिशन पीपीई किट तयार करण्याचा कारनामा केला आहेही पीपीई किट परिधान केल्यानंतर कोरोना वॉरियर्स आरामात आपले काम करू शकतील

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे वैद्यकीय जगतासमोर रुग्णांवर उपचार करण्याचे मोठे आव्हान निर्माण झालेले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना या आजाराच्या संसर्गाचा मोठा धोका असतो. त्यामुळे कोरोनाबाधितांवर उपचार करताना पीपीई किटचा वापर करणे डॉक्टर आणि अन्य वैद्यकी कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक बनले आहे. अशा परिस्थितीत पीपीई किट काढल्यानंतर पूर्णपणे थकून गेलेले आणि घामाने डबडबलेल्या डॉक्टरांचे फोटो तुम्ही पाहिलेच असतील. मात्र पीपीई किटमुळे डॉक्टर आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांना होणारा त्रास आता कमी होण्याची शक्यता आहे.

संपूर्णपणे सीलबंद असणाऱ्या पीपीई किटमध्ये एसी फिट करण्याची अजब कल्पना एका अवलिया संशोधकाने शोधून काढली आहे. जबलपूरमधील एका युवकाने ही एअरकंडिशन पीपीई किट तयार करण्याचा कारनामा केला आहे. ही पीपीई किट परिधान केल्यानंतर कोरोना वॉरियर्स आरामात आपले काम करू शकतील. ही पीपीई किट सुमारे पाच ते सहा तास थंड राहू शकते, असा दावा या तरुणाने केला आहे. तसेच ही पीपीई किट पेटंट मिळवण्यासाठी पाठवण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त हिंदी संकेतस्थळ न्यूज २४ ने प्रसारित केले आहे. 



ही पीपीई किट बनवण्यासाठी केवळ तीन हजार ५०० रुपये एवढाच खर्च आला आहे. ही पीपीई किट तयार करण्यासाठी वापरलेले तंत्र हे रॉकेटचे इंजिन थंड करण्यासाठी वापरले जाते. यामध्ये एका पाईपच्या माध्यमातून थंड हवा पीपीई किटच्या आत जाईल. हे उपकरण एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे सहा तासांपर्यंत वापरता येते. तसेच याचे वजन केवळ ८०० ग्रॅम आहे.

एअरकंडिशन असलेली पीपीई किट तयार करणाऱ्या या तरुणाचे नाव मोहम्मद मंसुरी असून, इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमधून बी-टेक करत आहे. या तरुणाने या शोधाचे नामकरण व्हेंटिलेटेज पर्सनव प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट असे केले आहे. हे उपकरण पीपीई किटला जोडून कमरेवर बांधता येऊ शकते. तसेच ही पीपीई किट वजनाने अगदी हलकी आहे.

दरम्यान, या विद्यार्थ्याने तयार केलेल्या पीपीई किटचे जिल्हा प्रशासनाने कौतुक केले आहे. तसेच वैद्यकीय विभागाच्या माध्यमातून या पीपीई किटबाबतचा एक प्रस्ताव इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ला पाठवला आहे. तसेच या शोधाबाबतचे प्रेझेंटेशन पीएमओलादेखील पाठवण्यात येणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा

केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

Web Title: coronavirus: Wow! An AC PPE kit created by an engineering student works like this ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.