CoronaVirus Lockdown News: देशाला माझी गरज, दारू आणायला जाऊ द्या; पोलिसांनी अडवताच लोक सांगताहेत भन्नाट कारणं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 09:23 AM2021-04-18T09:23:51+5:302021-04-18T09:24:10+5:30
CoronaVirus Lockdown News: देशातील अनेक शहरांमध्ये वीकेंड लॉकडाऊन; घरी थांबण्याचं आवाहन करूनही अनेकजण विनाकारण बाहेर
दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक झपाट्यानं वाढत आहे. राजधानी दिल्लीत कोरोना वेगानं हातपाय पसरत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केजरीवाल सरकारनं वीकेण्ड कर्फ्यू लागू केला आहे. मात्र तरीही लोक घरी थांबायला तयार नाहीत. अनेक जण तर गरज नसताना बाहेर पडत आहेत. पोलिसांनी त्यांना अडवलं असता एकापेक्षा एक कारणं देत आहेत. उनाड मंडळींकडून दिली जाणारी कारणं पोलिसांना डोक्यावर हात मारण्याची वेळ आली आहे.
राज्यात कडक लॉकडाऊन करा, सरकारमधील ज्येष्ठ मंत्र्याची मागणी; अजितदादांशी चर्चा, मुख्यमंत्र्यांशीही बोलणार
वीकेण्ड लॉकडाऊन सुरू असताना पोलिसांनी एका व्यक्तीला रोखलं. सध्या नवरात्र सुरू आहे. एका ठिकाणी मातेची उपासना सुरू आहे. तिथे जात असल्याचं कारण त्यानं दिलं. मातेची उपासना अत्यावश्यक सेवेत येते का, असा प्रश्न पोलिसांनी त्याला विचारलं. त्यावर अनेक दिवसांपासून मी तिथे जातो. आता सवय झाली आहे, असं त्या व्यक्तीनं सांगितलं.
सगळ्यांनी मिळून माझ्या बाबांना मारून टाकलं; कोरोनानं वडील गमावलेल्या मुलाचा आक्रोश
''देश संकटात आहे, मला जाऊ द्या''
एका व्यक्तीला पोलिसांनी लॉकडाऊन दरम्यान हटकलं. पोलिसांनी जामिया परिसरात या व्यक्तीला रोखलं. या व्यक्तीनं सांगितलेलं कारण ऐकून पोलिसांनी अक्षरश: डोक्यावर हात मारला. मी दारू आणायला जात आहे. माझा देश संकटात आहे. त्यामुळे मी दारू आणायला निघालो आहे. यामुळे सरकारला महसूल मिळेल, असा युक्तीवाद या व्यक्तीनं केला. पोलिसांनी त्या व्यक्तीकडून दंड आकारला आणि त्याला घरी जाण्यास सांगितलं.
वीकेण्ड लॉकडाऊन असल्यानं ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. नागरिकांनी नियमांचं उल्लंघन करू नये यासाठी पोलीस तैनात आहेत. नियम मोडणाऱ्यांना पकडून पोलीस त्यांच्याकडून दंड आकारत आहेत. मात्र तरीही अनेक जण नियम मोडत आहेत. भाजी आणायला जात आहे. पीठ संपलं आहे. ते आणायला जात आहे, अशी एकापेक्षा एक कारणं नागरिक देत आहेत. काही जण तर पोलिसांशी विनाकारण हुज्जत घालत आहेत.