coronavirus : योगी सरकारने 27 लाख मनरेगा मजुरांच्या खात्यात जमा केले 611 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 12:14 PM2020-03-30T12:14:22+5:302020-03-30T12:16:23+5:30

लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद झाल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

coronavirus: Yogi government deposits Rs 611 crore into 27 lakh MGNREGA laborers accounts BKP | coronavirus : योगी सरकारने 27 लाख मनरेगा मजुरांच्या खात्यात जमा केले 611 कोटी

coronavirus : योगी सरकारने 27 लाख मनरेगा मजुरांच्या खात्यात जमा केले 611 कोटी

Next
ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद झाल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नयोगी सरकारने उत्तर प्रदेशमधील सुमारे 27 लाख मनरेगा मजुरांच्या खात्यात एकूण 611 कोटी रुपये जमा केले योगी सरकारने राज्यातील रोजंदारीवर काम करणाऱ्या सुमारे 20 लाख मजुरांच्या खात्यात यापूर्वीच प्रत्येकी एक हजार रुपये जमा केले होते.

लखनौ -  कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद झाल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, या अडचणीत असलेल्या मजुरांच्या मदतीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पुढाकार घेतला आहे. योगी सरकारने उत्तर प्रदेशमधील सुमारे 27 लाख मनरेगा मजुरांच्या खात्यात एकूण 611 कोटी रुपये जमा केले आहेत. दरम्यान, योगी सरकारने राज्यातील रोजंदारीवर काम करणाऱ्या सुमारे 20 लाख मजुरांच्या खात्यात यापूर्वीच प्रत्येकी एक हजार रुपये जमा केले होते.

योगी आदित्यनाथ म्हणाले की, अंत्योदय योजना, मनरेगा आणि श्रम विभागात नोंद असलेल्या सुमारे एक कोटी 65 लाख 31 हजार मजुरांना एका महिन्याचे धान्य मोफत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कुटुंबांना   20 किलो गहू आणि 15 किलो तांदूळ मोफत मिळतील. त्याशिवाय निवृत्ती वेतनाचा लाभ घेणाऱ्या 83 लाख 83 हजार जणांना दोन महिन्यांचे निवृत्तीवेतन आगावू देण्यात येत आहे.

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी रविवारी सुमारे 1 लाख 63 हजार  भाजपा कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी योगी यांनी अधिकाधिक लोकांना भाजपा कार्यकर्त्यांनी मदत करावी, असे आवाहन केले.  तसेच भाजपाच्या एका बुथ प्रमुखाने किमान 10 गरीबांच्या भोजनाची व्यवस्था करावी, असे ते म्हणाले.

Web Title: coronavirus: Yogi government deposits Rs 611 crore into 27 lakh MGNREGA laborers accounts BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.