Coronavirus: तुम्हीच ठरवा! २१ दिवस घरात राहायचं की २ वर्ष जेलमध्ये जायचं; वाचा काय होणार शिक्षा?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 10:09 AM2020-03-25T10:09:27+5:302020-03-25T10:14:23+5:30
२१ दिवसांचा लॉकडाऊन दरम्यान जर कोणी नियम आणि सूचनांचे पालन केले नाही तर त्यांच्यावर आपत्कालीन कायदा कलम ५१ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.
नवी दिल्ली – देशभरात कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद राहणार आहेत. लोकांनी घराबाहेर पडू नका असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पण काही लोक सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करत नाहीत, घराच्या बाहेर विनाकारण फिरायला जातात यांना चाप लावण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे.
विनाकारण घराच्या बाहेर तुम्ही फिरत असाल तर तुम्हाला जेलची हवा खावी लागणार आहे. लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्यास एक महिन्यापासून २ वर्ष जेलची शिक्षा होईल. त्याचसोबत तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी लोकांना कडक शब्दात इशारा दिला आहे. लोकांनी अशी परिस्थिती बनवू नये जेणेकरुन गाळीबार करावा लागू शकतो असं त्यांनी बजावलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
२१ दिवसांचा लॉकडाऊन दरम्यान जर कोणी नियम आणि सूचनांचे पालन केले नाही तर त्यांच्यावर आपत्कालीन कायदा कलम ५१ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. यामध्ये शिक्षा आणि दंड दोन्ही होणार आहे. लॉकडाऊन न पाळल्याने २०० रुपये दंड आणि १ महिना जेल अशी शिक्षा आहे. पण यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडत असेल तर दंगलपरिस्थितीत ६ महिने जेलची शिक्षा वाढू शकते. तसेच जर तुम्ही नियमांचे पालन करत नसाल अन् तुमच्यामुळे इतरांच्या जीवाला धोका पोहचत असेल तर तुम्हाला २ वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते.
अफवा पसरवल्यातर काय होईल?
गृह मंत्रालयाने काढलेल्या आदेशानुसार जर कोरोनाबाबत कोणत्याही प्रकारची अफवा पसरवली तर १ वर्षापर्यंत जेलची शिक्षा होईल त्याचसोबत दंडही भरावा लागेल. कोरोनाग्रस्तांच्या मदतीच्या बहाण्याने पैसे लाटण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई होणार आहे त्यांना २ वर्षापर्यंत जेलमध्ये राहावं लागेल. सरकारच्या सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील २१ दिवस घराच्या बाहेर पडू नका. स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी असं सांगण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
अबब! कोरोनाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानने खजिना उघडला; रक्कम ऐकून थक्क व्हाल
प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! देशातील रेल्वेसेवा 14 एप्रिलपर्यंत बंद
कोरोनानं भारतात ५६० लोक संक्रमित, ११ जणांनी गमावला जीव
पुणेकरांसाठी गुढी पाडवा घेऊन आला आनंदवार्ता : कोरोनाचे पाच रुग्ण झाले बरे
संपूर्ण देशात २१ दिवस लॉकडाऊन; पंतप्रधान नरेंद्र मोदी कसं करतायेत ‘वर्क फ्रॉम होम’? पाहा