CoronaVirus : चक्क दारूच्या दुकानाबाहेर 'घुंघट'मध्ये महिला, पण का?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 05:04 PM2020-05-06T17:04:26+5:302020-05-06T17:10:45+5:30
राजस्थानमधील जयपुरमधला एक व्हिडीओ पाहिला तर यामध्ये रांगेत उभ्या असणा-या महिला स्वतःहून रांगा लावून उभ्या नव्हत्या.
आजही देशातील काही भागांमध्ये घुंघट प्रथा कायम आहे. यामध्ये राजस्थान आघाडीवर आहे. तेथील महिला नेहमीच घुंघटमध्ये राहणे पसंत करतात. सभ्यतेचे दर्शन म्हणून घुंघट घेण्याची प्रथा असताना दारूच्या दुकानाबाहेर घुंघटमध्ये काही महिलांची रांग लागल्याचे पाहून अनेकांना धक्काच बसेल. पण त्यामागे काही कारण आहे.
गेल्या आठवड्यात केंद्रीय गृह मंत्रालयाने लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल करत दारूची दुकाने उघडण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे. त्यानंतर दारूच्या दुकानाबाहेर मद्यप्रेमींनी लांबच लांब रांगा लावल्याचे दिसून आले. मात्र, राजस्थानमधील जयपुरमधला एक व्हिडीओ पाहिला तर यामध्ये रांगेत उभ्या असणा-या महिला स्वतःहून रांगा लावून उभ्या नव्हत्या. तर त्यांच्या नव-यांनीच त्या महिलांना दारू खरेदीसाठी पाठविण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दुसरीकडे, देशातील विविध भागात महिलाच दारुविक्रीला विरोध करताना दिसतात. मात्र राजस्थानमधील महिला याला पाठिंबा देत असल्याचीही चर्चाही सुरू आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मद्यप्रेमींनी रांगेत उभे राहण्याची मेहनत वाचावी म्हणून त्यांनी त्यांच्या बायकांना रांगेत उभे केल्यामुळे अनेक नेटीझन्स संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान, दारू खरेदीसाठी उडालेली झुंबड आणि नागरिकांची बेशिस्त वागणूक पाहून काही शहरामध्ये पुन्हा दारूची दुकाने उघडण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.
मुंबईमध्ये दारूची दुकाने बंद करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. तसेच, मुंबईप्रमाणे इतर ठिकाणी होणारी दारू विक्रीदेखील बंद करण्यात यावी, अशी मागणी विविध संघटनांकडून होत आहे.