Coronvirus: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना कोरोनाची लागण; उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये केलं दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 16:57 IST2020-08-02T16:57:24+5:302020-08-02T16:57:39+5:30
माझी तब्येत ठीक आहे, परंतु डॉक्टर्सच्या सल्ल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अशी माहिती अमित शहांनी दिली.

Coronvirus: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना कोरोनाची लागण; उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये केलं दाखल
नवी दिल्ली – देशात कोरोनाचं संकट कायम असताना आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. याबाबत स्वत: अमित शहांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. कोरोनाच्या सुरुवाती लक्षण दिसल्यानंतर अमित शहांनी टेस्ट केली होती, त्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आता अमित शहा राम मंदिर भूमीपूजनालाही उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे.
याबाबत अमित शहा म्हणाले की, माझी तब्येत ठीक आहे, परंतु डॉक्टर्सच्या सल्ल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मागील काही काळात माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी तात्काळ स्वत:ला आयसोलेट करुन कोविड टेस्ट करावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.
Union Home Minister Amit Shah tests positive for #COVID19. He is being admitted to the hospital. pic.twitter.com/jgYN2wBEzA
— ANI (@ANI) August 2, 2020