नगरसेवक नितीन माळीला अटक

By admin | Published: February 23, 2016 12:03 AM2016-02-23T00:03:55+5:302016-02-23T00:03:55+5:30

जळगाव : पिंपळगाव बुद्रूक, ता.भुसावळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍याच्या मृत्यूप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्‘ातील आरोपी वरणगाव नगरपरिषदेचे नगरसेवक नितीन उर्फ बबलू निवृत्ती माळी (३६, रा.माळीवाडा, वरणगाव, ता.भुसावळ) यांना पोलिसांनी सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अटक केली.

Corporator Nitin Mali arrested | नगरसेवक नितीन माळीला अटक

नगरसेवक नितीन माळीला अटक

Next
गाव : पिंपळगाव बुद्रूक, ता.भुसावळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍याच्या मृत्यूप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्‘ातील आरोपी वरणगाव नगरपरिषदेचे नगरसेवक नितीन उर्फ बबलू निवृत्ती माळी (३६, रा.माळीवाडा, वरणगाव, ता.भुसावळ) यांना पोलिसांनी सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अटक केली.
पिंपळगाव बुद्रूक प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त असलेले डॉ.दिनेश अमृत पाटील (२८, रा.हरेश्वरनगर, जळगाव) यांनी सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून १८ ते १९ नोव्हेंबर २०१५ रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी ईश्वर भागवत पवार (रा.श्रीरामनगर, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जि.प. सदस्य संजय पाटील (रा.दर्यापूर, ता.भुसावळ), नितीन निवृत्ती माळी (रा.वरणगाव), अविनाश सुरेश चौधरी (रा.पिंपळगाव बुद्रूक) व सुपडू उखा पाटील (रा.पिंपळगाव बुद्रूक) यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अविनाश चौधरी याला २१ नोव्हेंबर २०१५ रोजी अटक झाली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आता जिल्हापेठ पोलिसांनी या गुन्‘ात नितीन माळी यांना अटक केली. सोमवारी दुपारी त्यांना मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सरकारकडून ॲड.हेमंत मेंडकी यांनी तर आरोपींकडून ॲड.सागर चित्रे यांनी काम पाहिले.

Web Title: Corporator Nitin Mali arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.