नगरसेविकेच्या पतीकडून टँकर चालकास मारहाण

By admin | Published: December 20, 2014 10:27 PM2014-12-20T22:27:26+5:302014-12-20T23:40:23+5:30

- टँकरचालकांचा संप : ओसीडब्ल्यूकडून गुन्हा दाखल

Corporator's husband beat the tanker driver | नगरसेविकेच्या पतीकडून टँकर चालकास मारहाण

नगरसेविकेच्या पतीकडून टँकर चालकास मारहाण

Next

- टँकरचालकांचा संप : ओसीडब्ल्यूकडून गुन्हा दाखल
नागपूर : पारडी प्रभागातील काँग्रेसच्या नगरसेविका कुमुदिनी कैकाडे यांचे पती श्रीकांत कैकाडे यांनी टँकरचालकाला मारहाण केल्यामुळे पूर्व नागपुरातील टँकरचालक संपावर गेले आहेत. यामुळे शनिवारी या परिसरात टँकरने होणारा पाणीपुरवठा खंडित झाला. संबंधित प्रकरणी पाणीपुरवठा कंपनी ओसीडब्ल्यूच्या तक्रारीवरून कैकाडे यांच्या विरोधात कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ओसीडब्ल्यूने दिलेल्या तक्रारीनुसार सुभाननगर जलकुंभावरून नगरसेविका कैकाडे यांनी टँकर मागविले होते मात्र, टँकर पोहचलेच नाही. त्यामुळे कैकाडे यांचे पती श्रीकांत हे दुपारी सुभाननगर जलकुंभावर पोहचले व त्यांनी हाइड्रन सुपरवायजर मनीष भुजभाटकर यांना धक्काबुक्की करीत त्यांना मारहाण केली. या मारहाणीचा निषेध करीत टँकरचालक एकत्र आले व त्यांनी पारडी परिसरात पाणीपुरवठा करण्यास नकार दिला. त्यामुळे शेकडो नागरिकांना टँकरद्वारे पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. ओसीडब्ल्यूने दावा केला आहे की, टँकरचालक पारडी परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात व्यस्त होते. कैकाडे मात्र आपल्याच प्रभागात तातडीने पाणीपुरवठा करण्यासाठी दबाव टाकत होते. त्यानंतर एक टँकर पाठविण्यात आला. मात्र काही नागरिकांनी धार्मिक कार्यकमासाठी संबंधित टँकर स्वत:कडेच थांबवून घेतले. यानंतर संबंधित प्रकार घडला.
घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत टँकरने पाणीपुरवठा बंद होता. कैकाडे यांनी माफी मागितल्याशिवाय पाणीपुरवठा करणार नाही, अशी भूमिका टँकरचालकांनी घेतली होती.
येथून दररोज ६२ टँकरद्वारे ४३३ फेऱ्या मारल्या जातात. या घटनेमुळे टँकरच्या सुमारे २५० फेऱ्या होऊ शकल्या नाहीत.

चौकट...
सुपरवायजरने अपमानास्पद
वागणूक दिली : कैकाडे
याप्रकरणी नगरसेविका कुमुदिनी कैकाडे म्हणाल्या, एका कार्यक्रमासाठी टँकर मागविण्यात आला होता. सुभाननगर जलकुंभावरील सुपरवायजरला फोन करून टँकर पाठविण्यास सांगण्यात आले तेव्हा त्याने आपल्याशी असभ्यपणे संवाद साधला. अपमानजनक वागणूक दिली. त्यानंतर श्रीकांत कैकाडे जलकुंभावर गेले असता त्यांच्याशीही सुपरवायजरने वाद घातला. यातून पुढे वाद निर्माण झाला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Corporator's husband beat the tanker driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.