आत्मपरीक्षण करून चुका सुधारू - केजरीवाल

By admin | Published: April 30, 2017 12:50 AM2017-04-30T00:50:33+5:302017-04-30T00:50:33+5:30

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आम आदमी पार्टीचे (आप) संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी

Correcting mistakes by self-examination - Kejriwal | आत्मपरीक्षण करून चुका सुधारू - केजरीवाल

आत्मपरीक्षण करून चुका सुधारू - केजरीवाल

Next

नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आम आदमी पार्टीचे (आप) संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी चुकांची कबुली दिली. आम्ही चुकलो आहोत; पण पक्षाला पुनरुज्जीवित करण्यासाठी आम्ही आत्मपरीक्षण करून चुका दुरुस्त करू, असे त्यांनी म्हटले आहे.
दिल्ली महानगरपालिकेतील आपच्या पराभवास मतदान यंत्रांतील घोळ जबाबदार असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता; मात्र आपचे दुसरे नेते कुमार विश्वास यांनीच त्यांच्या या वक्तव्यास विरोध केला होता. पक्षाच्या कार्यपद्धतीवरही विश्वास यांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी ट्विट करून चुकांची कबुली दिली. अशा प्रकारे चुकांची कबुली देणे ही भारतीय राजकारणात दुर्मिळ बाब समजली जात आहे.
केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले की, ‘गेल्या दोन दिवसांत मी अनेक स्वयंसेवक आणि मतदारांशी बोललो आहे. सत्य परखड आहे. होय, आम्ही चुका केल्या आहेत; मात्र आम्ही आत्मपरीक्षण करून चुकांची दुरुस्ती करू. बदल न करणे मूर्खपणाचे ठरेल.’
केजरीवाल यांनी म्हटले की, ‘आम्ही मतदार आणि कार्यकर्त्यांचे देणे लागतो. आम्ही स्वत:चेही देणे लागतो. आता सबबी सांगणे नव्हे, तर कृती करणे गरजेचे आहे. कामावर परतण्याची ही वेळ आहे. आम्ही वेळोवेळी घसरत असलो तरी पकड शोधून स्वत:ला वर उठविणे महत्त्वाचे आहे.
लोक उणिवांसाठी अजिबात पात्र नाहीत. बदल हीच कायम टिकणारी गोष्ट आहे.’

पंजाब आणि गोव्यातील पराभवानंतर आपल्या अंगणात म्हणजेच दिल्लीतच आपला पराभवाचा सामना करावा लागला होता. दोनच वर्षांपूर्वी आपने दिल्ली विधानसभा प्रचंड बहुमताने जिंकली होती; पण आता आपच्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Correcting mistakes by self-examination - Kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.