भ्रष्ट अधिकाऱ्यांना नाही मिळणार पासपोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 04:57 AM2018-03-30T04:57:52+5:302018-03-30T04:57:52+5:30

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सरकारी अधिकाºयांना यापुढे पासपोर्ट जारी केला जाणार नाही. कार्मिक मंत्रालयाने हे स्पष्ट केले.

Corrupt officials will not get passport | भ्रष्ट अधिकाऱ्यांना नाही मिळणार पासपोर्ट

भ्रष्ट अधिकाऱ्यांना नाही मिळणार पासपोर्ट

Next

नवी दिल्ली : भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सरकारी अधिकाºयांना यापुढे पासपोर्ट जारी केला जाणार नाही. कार्मिक मंत्रालयाने हे स्पष्ट केले. ज्यांना वैद्यकीय उपचारांसाठी विदेशात जाणे आवश्यक आहे, त्यांना पासपोर्ट देण्याबाबत प्राधिकरण निर्णय घेऊ शकतील.
ज्या अधिकाºयांवर भ्रष्टाचाराचे आरोप असून त्यांची चौकशी सुरू आहे, ज्यांच्याविरोधात एफआयआर नोंदविलेला आहे अथवा ज्यांना निलंबित केले आहे, अशांना पासपोर्ट दिला जाणार नाही. अधिकाºयाच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले असेल, खटला सुरू असेल, भ्रष्टाचार किंवा अन्य गुन्ह्याप्रकरणी चौकशीचे आदेश असतील, अशा अधिकाºयांना पासपोर्ट जारी केला जाणार नाही.
स्वत:च्या वा नातेवाइकाच्या उपचारासाठी किंवा कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त सनदी अधिकाºयांना विदेशात तातडीने जावे लागू शकते. अशा वेळी त्यांना पासपोर्ट जारी करण्याबद्दल निर्णय घेण्यात येईल.

Web Title: Corrupt officials will not get passport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.