देशात ३७ हजार कोटींचा भ्रष्टाचार थांबला, ही तर सुरुवात - नरेंद्र मोदी
By admin | Published: May 28, 2016 11:05 PM2016-05-28T23:05:09+5:302016-05-28T23:48:27+5:30
देशात ३७ हजार कोटींचा भ्रष्टाचार थांबला, ही तर सुरुवात असून नवीन सकाळ असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, २८ - देशात ३७ हजार कोटींचा भ्रष्टाचार थांबला, ही तर सुरुवात असून नवीन सकाळ असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. दिल्लीतील इंडियावर मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
आम्ही भ्रष्टाचारविरोधात चांगल्या पद्धतीने पाऊले उचलली असून देशात आत्तापर्यंत ३७ हजार कोटींचा भ्रष्टाचार थांबला आहे. ही सुरुवात असून नवीन सकाळ आहे. सरकारने केलेल्या कामांच्या 'लेखाजोखा'च्या माध्यमातून आत्मविश्वास प्राप्त होतो. आमच्या सरकारने एक नविन विश्वास संपादन केला आहे. तर एकीकडे विकासवाद आणि विरोधवाद द्वंद सुरु असल्याचेही यावेळी नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील काही मुद्दे : -
- एकीकडे विकासवाद आणि विरोधवाद द्वंद
- जनता विकास आणि विरोधातील परिक्षण करण्यास समर्थ
- आमच्या सरकारने एक नविन विश्वास संपादन केला आहे.
- जनता दूध का दूध आणि पाणी का पाणी करेल.
- आम्ही भ्रष्टाचारविरोधात चांगल्या पद्धतीने पाऊले उचलली आहेत.
- जी मुलगी जन्मली नाही, तिला सरकारी फाईलमध्ये विधवा दाखवून पेन्शन देण्यात आले.
- आत्तापर्यंत १ कोटी ६२ लाख बनावट रेशन कार्ड जप्त करण्यात आले आहेत.
- जनतेचे १५ हजार कोटी आमच्या सरकारने वाचविले.
- गरीबांच्या एक रुपये किलो तांदूळसाठी केंद्र सरकार २७ रुपये खर्च करते.
- एलईडी बल्ब आता ६० ते ७० रुपयाला मिळतो, आधी तो २०० रुपयाला मिळत होता.
- देशात ३७ हजार कोटींचा भ्रष्टाचार थांबला, ही तर सुरुवात आहे.
- एक वेळ लोकांवर विश्वास करुन बघा, बदल नक्की दिसेल.
- पहिल्या सरकारमध्ये काय झाले आणि आज काय झाले, याची तुलना करने गरजेचे आहे.
- एका वर्षात ३ कोटी लोकांना गॅस कनेक्शन देण्यात आले.
- येत्या तीन वर्षात ५ कोटी लोकांना गॅस कनेक्शन देण्यात येईल.