भ्रष्टाचाराचा आरोप; केजरीवालांचे प्रधान सचिव अटकेत

By admin | Published: July 5, 2016 04:18 AM2016-07-05T04:18:20+5:302016-07-05T04:18:20+5:30

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे प्रधान सचिव राजेंद्र कुमार आणि अन्य चार अधिकाऱ्यांना सीबीआयने सोमवारी संध्याकाळी भ्रष्टाचारात सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक

Corruption charges; Suspended Principal Secretary of Kejriwal | भ्रष्टाचाराचा आरोप; केजरीवालांचे प्रधान सचिव अटकेत

भ्रष्टाचाराचा आरोप; केजरीवालांचे प्रधान सचिव अटकेत

Next

- नबीन सिन्हा , नवी दिल्ली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे प्रधान सचिव राजेंद्र कुमार आणि अन्य चार अधिकाऱ्यांना सीबीआयने सोमवारी संध्याकाळी भ्रष्टाचारात सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. त्यामुळे संपूर्ण दिल्लीत खळबळ माजली आहे.
सीबीआयने गेल्या वर्षी राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर छापे घातले होते. त्यावेळी केजरीवाल व त्यांच्या आम आदमी पक्षाने सीबीआय आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती.
राजेंद्र कुमार यांनी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करून २00७ ते २0१४ या काळात मेसर्स एन्डेव्हर सिस्टीम्स प्रायवे्हेट लिमिटेड या कंपनीला सरकारी कामे दिली होती, असे सीबीआय सूत्रांनी सांगितले. राजेंद्र कुमार यांना भारतीय दंड संहितेच्या कलम १२0 (ब) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
राजेंद्र कुमार हे ५0 कोटींच्या भ्रष्टाचारातील प्रमुख सूत्रधार असल्याचे सांगण्यात येत असून, २00६ सालीच त्यांनी हे प्रकार सुरू केले होते, असे सीबीआयचे म्हणणे आहे. सीबीआयच्या म्हणण्यानुसार राजेंद्र कुमार यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात १६ डिसेंबर २0१५ रोजी घालण्यात आलेल्या छाप्यांमध्ये त्यांनी गुन्हेगारी स्वरूपाचा कट करून आणि पदाचा दुरुपयोग करून, भ्रष्टाचार केला, असे प्रथमदर्शनी आढळून आले आहे.
सीबीआयने राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयात छापे घातले होते. त्यावेळी केजरीवाल यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या सूचनेनुसार आपल्या कार्यालयातच छापे घालण्यात आल्याचा आरोप केला होता.
मात्र केजरीवाल यांच्या कार्यालयात धाडी घातल्याचा सीबीआयने इन्कार केला होता.

- राजेंद्र कुमार १९८९ च्या बॅचमधील आयएएस अधिकारी असून, केजरीवाल यांनी पहिल्यांदा २0१४ साली निवडून आल्यानंतर त्यांची आपल्या कार्यालयात नियुक्ती केली होती. त्यावरून मुख्यमंत्री आणि दिल्लीचे राज्यपाल नजीब जंग यांच्यात वाद झाला होता.
- राजेंद्र कुमार यांच्याकडे केजरीवाल यांनी अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी दिली होती. आपल्या विश्वासातील संदीप कुमार या अधिकाऱ्याच्या त्याने अनेक महत्त्वाच्या ठिकाणी नियुक्त्या करून भ्रष्टाचार केलाचार केला असे सांगण्यात आले.

Web Title: Corruption charges; Suspended Principal Secretary of Kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.