२० राज्यांत २०१८ च्या तुलनेत भ्रष्टाचार घटला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 05:00 AM2019-11-28T05:00:50+5:302019-11-28T05:01:06+5:30
भारतातील २० राज्यांत वर्ष २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये भ्रष्टाचार १० टक्क्यांनी खाली आला आहे, असे ‘इंडिया करप्शन सर्व्हे २०१९’च्या अहवालात म्हटले आहे.
नवी दिल्ली : भारतातील २० राज्यांत वर्ष २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये भ्रष्टाचार १० टक्क्यांनी खाली आला आहे, असे ‘इंडिया करप्शन सर्व्हे २०१९’च्या अहवालात म्हटले आहे.
ही पाहणी ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल इंडिया आणि लोकल सर्कल्स या स्वतंत्र संस्थांनी केली होती. २०१८ मध्ये लाच देणाऱ्यांची टक्केवारी ५८ होती. ती २०१९ मध्ये ५१ झाली.
२०१७ मध्ये हीच टक्केवारी ४५ टक्के होती. पाहणीमध्ये दिल्ली, हरयाणा, गुजरात, पश्चिम बंगाल, केरळ, गोवा आणि ओदिशामध्ये भ्रष्टाचाराचे कमी प्रकार घडले, तर राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, झारखंड आणि पंजाबमध्ये जास्त होते.
जास्त प्रमाणात लाच मालमत्तांची नोंदणी आणि जमिनीच्या प्रकरणांची कामे पाहणाºया अधिकाऱ्यांना दिली गेली. त्यानंतर पोलीस, महानगरपालिका, वीज मंडळ, वाहतूक अधिकारी, कर आणि पाणी विभागातील अधिकाºयांना. सरकारी कार्यालयांत लाच देण्याची वेळ येते तेव्हा पाहणी केलेल्या बहुतेक लोकांनी म्हटले की, अकार्यक्षमता किंवा सक्तीमुळे आम्ही ती दिली.