खर्च २९ हजार उत्पन्न ३६ हजार कांदा उत्पादकांची व्यथा : गावोगावी जाऊन विक्री करायची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2016 12:32 AM2016-04-10T00:32:35+5:302016-04-10T00:32:35+5:30

जळगाव- चढ्या दरांमुळे अनेकदा ग्राहकांच्या डोळ्यांमध्ये पाणी आणणार्‍या कांद्याने आता शेतकरी किंवा कांदा उत्पादकांच्या डोळ्यांमध्ये पाणीच आणले नाही तर त्यांची मोठी आर्थिक कोंडी केली आहे. कांद्याचा एकरी उत्पादन खर्च सध्या २९ हजार रुपये आहे. आणि कांद्याचे एकरी उत्पन्न २६ हजार रुपये आहे. अर्थातच फक्त सात हजार रुपयांसाठी या १२० दिवसांच्या पिकाचे संगोपन करण्याची वेळ शेतकर्‍यांवर दरांमधील घसरणीमुळे आली आहे.

The cost of 36,000 onion growers is 29,000: the time to go to the villages and sell them | खर्च २९ हजार उत्पन्न ३६ हजार कांदा उत्पादकांची व्यथा : गावोगावी जाऊन विक्री करायची वेळ

खर्च २९ हजार उत्पन्न ३६ हजार कांदा उत्पादकांची व्यथा : गावोगावी जाऊन विक्री करायची वेळ

Next
गाव- चढ्या दरांमुळे अनेकदा ग्राहकांच्या डोळ्यांमध्ये पाणी आणणार्‍या कांद्याने आता शेतकरी किंवा कांदा उत्पादकांच्या डोळ्यांमध्ये पाणीच आणले नाही तर त्यांची मोठी आर्थिक कोंडी केली आहे. कांद्याचा एकरी उत्पादन खर्च सध्या २९ हजार रुपये आहे. आणि कांद्याचे एकरी उत्पन्न २६ हजार रुपये आहे. अर्थातच फक्त सात हजार रुपयांसाठी या १२० दिवसांच्या पिकाचे संगोपन करण्याची वेळ शेतकर्‍यांवर दरांमधील घसरणीमुळे आली आहे.
कांद्याचे दर वाढले की सर्वत्र चर्चा होते. प्रसारमाध्यमे व सरकारमधील मंडळी याच विषयावर बोलताना दिसते. पण याच कांद्याने आता शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका दिला आहे. अशा वेळी कुठीही चर्चा होताना दिसत नाही, अशी व्यथा किनगाव येथील कांदा उत्पादक तथा शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष कडूजी पाटील यांनी मांडली आहे. १२० दिवस पिकाजी जोपासना करून फक्त सात हजार रुपये नफा तूर्त दिसतो. त्यात कांद्याची खांडणी किंवा काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी कांद्यावर रोटाव्हेटर फिरविला आहे.

कांद्याला सध्या मणमागे १८० ते १९० रुपये दर आहे. यानुसार कांद्याचे कमाल १९० ते २०० मण उत्पादन एकरात मिळते. ही बाब लक्षात घेता जेवढा खर्च कांद्याला एक एकरसाठी लागतो. त्या तुलनेत सध्या दर नाहीत.
कांद्याचा एकरी खर्च
(खर्च रुपयात)
नांगरटी- १३००
रोटाव्हेटर- १०००
सर्‍या पाडणे- १०००
बियाणे- ६०००
खते- ५०००
तण नियंत्रण- ३०००
काढणी- ८०००
फवारणी- ३०००
इतर -१०००
(या खर्चात संबंधित कांदा उत्पादकाचे श्रम व वाहतूक खर्च धरलेला नाही)

गावोगावी फिरून विक्री
कांद्याला व्यापार्‍यांकडून सध्या एरंडोल, यावल, चोपडा तालुक्यातील अनेक कांदा उत्पादक गावोगावी जाऊन कांद्याची विक्री करताना दिसत आहेत. शहरातही रोज काही शेतकरी ट्रॅक्टर भरून कांदा आणतात व रहिवासी भागातील मोठ्या चौकात त्याची विक्री सुरू करतात. दोन पैसे अधिक मिळावेत, असा त्यांचा प्रयत्न आहे.

नि:शुल्क निर्यात
कांद्यावर मध्यंतरी टनमागे ४६ हजार रुपये निर्यात शुल्क केंद्र सरकारने लावले होते. यामुळे कांदा निर्यात बंद झाली. आता कांद्याची निर्यात नि:शुल्क असली तरी इतर देश आपल्याकडील कांद्यास पसंती देत नाहीत. कांद्यासंबंधी धरसोड वृत्तीचे धोरण असल्याने इतर देशांमध्ये आपल्या देशाबाबत विश्वास नाही, अशी प्रतिक्रियाही कडूजी पाटील यांनी दिली.

Web Title: The cost of 36,000 onion growers is 29,000: the time to go to the villages and sell them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.