मोठी बातमी! एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात; उद्यापासून नवे दर लागू होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 07:49 PM2021-03-31T19:49:04+5:302021-03-31T19:57:52+5:30

गेल्या दोन महिन्यांत सिलिंडर १२५ रुपयांनी महागलेला सिलिंडर अखेर स्वस्त

Cost Of Domestic LPG Cylinder To Reduce From April 1 says Indian Oil Corporation | मोठी बातमी! एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात; उद्यापासून नवे दर लागू होणार

मोठी बातमी! एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात; उद्यापासून नवे दर लागू होणार

Next

मुंबई: पेट्रोल, डिझेलसोबतच गेल्या काही महिन्यांत एलपीजी सिलिंडरचे दरदेखील गगनाला भिडले. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसला. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांमुळे अन्नधान्याचे दर वाढले असताना त्यात सिलिंडरच्या वाढत्या दरांनी आणखी भर घातली. मात्र उद्यापासून सिलिंडरच्या दरात कपात होणार आहे. इंडियल ऑईल कॉर्पोरेशननं याबद्दलची माहिती दिली आहे. उद्यापासून सिलिंडरच्या दरात १० रुपयांनी कपात होणार आहे. (Cost Of Domestic LPG Cylinder To Reduce From April 1)

पेट्रोल-डिझेल होऊ शकते आणखी स्वस्त; ग्राहकांना फायदा होणार

सिलिंडरचे नवे दर १ एप्रिलपासून लागू होणार असल्याचं इंडियल ऑईल कॉर्पोरेशननं सांगितलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर घसरले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल, डिझेलच्या दरातही घसरण होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या आठवड्याभरात पेट्रोल, डिझेलच्या दरात तीनवेळा कपात झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील सध्याची स्थिती पाहता यात आणखी घट होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.




गुड न्यूज! आता घरबसल्या ऑर्डर करा; पेट्रोल-डिझेलची मुंबई व दिल्लीत होम डिलिव्हरी

सध्या १४.३ किलोग्रॅमच्या विनाअनुदानित सिलिंडरसाठी मुंबईत ८१९ रुपये मोजावे लागतात. दिल्लीतही सिलिंडरचा दर इतकाच आहे. तर कोलकात्यात सिलिंडरसाठी ८४५.५० रुपये, चेन्नईत ८३५ रुपये मोजावे लागतात. इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं सिलिंडरच्या दरात कपात केल्यानं उद्यापासून मुंबई, दिल्लीत सिलिंडर ८०९ रुपयांना मिळेल. तर कोलकात्यात ८३५.५० रुपयांना आणि चेन्नईत ८२५ रुपयांना मिळेल.

गेल्या २ महिन्यांत सिलिंडर १२५ रुपयांनी महागला
गेल्या काही दिवसांपासून घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरांत सातत्यानं वाढ सुरू होती. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये स्वयंपाकाच्या सिलिंडरची किंमत १२५ रुपयांनी वाढली. ४ फेब्रुवारीला सिलिंडरची किंमत २५ रुपयांनी वाढली. त्यानंतर १५ फेब्रुवारीला सिलिंडरचा दर ५० रुपयांनी वाढला. २५ फेब्रुवारीला २५ रुपयांची, त्यानंतर १ मार्चला २५ रुपयांची वाढ झाली. 

Web Title: Cost Of Domestic LPG Cylinder To Reduce From April 1 says Indian Oil Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.