ट्रेनजवळ सेल्फी काढणे पडले महाग, विद्यार्थ्याने गमावला जीव
By admin | Published: February 1, 2016 12:06 PM2016-02-01T12:06:24+5:302016-02-01T12:10:09+5:30
चेन्नईत एका विद्यार्थ्याला रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेसमोर सेल्फी काढल्यामुळे जीव गमवावा लागला.
Next
>ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. १ - सेल्फी काढण्याचे वेड जीवावर बेतल्याची मुंबईतील घटना अद्याप ताजी असतानाच एका विद्यार्थ्याला रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेसमोर सेल्फी काढल्यामुळे जीव गमवावा लागला. रविवारी संध्याकाळी चेन्नईमध्ये ही दुर्दैवी घटना घडली.
पुनामल्ली अरींग्नार अण्णा शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयात ११ वीत शिकणारा दिनेश त्याच्या मित्रांसोबत पार्कमधून परत येत असताना त्याला एका ट्रेनसमोर फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. तो मित्रांबरोबर सेल्फीचा अँगल ठरवत असताना एवढा मग्न झाला होता की त्याला कशाचेच भान उरले नाही आणि भरधाव वेगाने आलेल्या ट्रेनने उडवल्याने त्याचा मृत्यू झाला.
गेल्या महिन्यात मुंबईतील बँडस्टँड येथे सेल्फी काढताना दोन जण बुडाले होते. बँडस्टँड येथील किल्ल्यावर तीन तरूणी सेल्फी काढत असताना तोल गेल्याने सुमद्रात पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी रमेश वाळुंज याने समुद्रात उडी घेतली आणि दोन मुलींना वाचवले. मात्र तिसऱ्या तरुणीला वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना तोही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. जगभरात गेल्यावर्षी २७ जणांचा सेल्फी काढताना मृत्यू झाला असून त्यातील अर्धे जण भारतातील आहेत.