पक्क्या अतिक्रमणांची मोजणी टपर्‍या, ओट्यांचे अतिक्रमण : बळीरामपेठेतील हॉकर्ससाठी गोलाणीत पुरेसे ओटे उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2016 12:47 AM2016-04-18T00:47:21+5:302016-04-18T00:47:21+5:30

जळगाव : मनपाच्या नगररचना विभागातर्फे आता बळीराम पेठेतील चौबे चौक ते शनिपेठ पोलीस चौकीपर्यंतच्या रस्त्यावरील पक्क्या अतिक्रमणांची मोजणी करण्यात आली. या रस्त्यावर टपर्‍या, ओटे, दुकानांच्या शेड आदी सुमारे २५ पक्की अतिक्रमणे असल्याचे आढळून आले आहे. सोमवारी घाणेकर चौकापासून ते ब्राšाणसभेपर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमणांची मोजणी केली जाणार आहे.

Counting of encroachments, encroachment of oats: adequate oats are available for the Hawkers | पक्क्या अतिक्रमणांची मोजणी टपर्‍या, ओट्यांचे अतिक्रमण : बळीरामपेठेतील हॉकर्ससाठी गोलाणीत पुरेसे ओटे उपलब्ध

पक्क्या अतिक्रमणांची मोजणी टपर्‍या, ओट्यांचे अतिक्रमण : बळीरामपेठेतील हॉकर्ससाठी गोलाणीत पुरेसे ओटे उपलब्ध

Next
गाव : मनपाच्या नगररचना विभागातर्फे आता बळीराम पेठेतील चौबे चौक ते शनिपेठ पोलीस चौकीपर्यंतच्या रस्त्यावरील पक्क्या अतिक्रमणांची मोजणी करण्यात आली. या रस्त्यावर टपर्‍या, ओटे, दुकानांच्या शेड आदी सुमारे २५ पक्की अतिक्रमणे असल्याचे आढळून आले आहे. सोमवारी घाणेकर चौकापासून ते ब्राšाणसभेपर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमणांची मोजणी केली जाणार आहे.
हॉकर्ससाठी पुरेसे ओटे
बळीरामपेठेतील हॉकर्सचे गोलाणी मार्केटमधील ओट्यांवर स्थलांतर केले जाणार आहे.
तसेच टॉवर चौक ते भिलपुरा पोलीस चौकीपर्यंतच्या रस्त्यावरील हॉकर्सचेही गोलाणी मार्केटमध्ये स्थलांतर केले जाणार आहे. गोलाणीत ३०० ओटे शिल्लक आहेत.
तर बळीरामपेठेतील हॉकर्सची संख्या मनपा दप्तरी असलेल्या नोंदीनुसार २७० आहे. त्यांना हे ओटे प्राधान्याने दिले जाणार आहेत. तर मोकळ्या जागांमध्ये प˜े आखून १२९ जागा देण्यात येणार आहेत. त्यात टॉवर चौक ते भिलपुरा पोलीस चौकीपर्यंतच्या रस्त्यावरील हॉकर्सचे स्थलांतर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गोलाणी मार्केटमध्ये काही पथदिवे बसविले आहेत. मात्र अद्यापही काही भागात रात्री खूप अंधार असतो. तेथे पथदिवे बसविण्याबाबत नगरसेवक अनंत जोशी यांनी विद्युत विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. मात्र निधीची अडचण दर्शविल्याने आयुक्त आल्यावर याविषयावर निर्णय होणार आहे.
------
पुढचा टप्पा सुभाष चौक ते कोंबडी बाजार
अतिक्रमण हटावच्या पुढच्या टप्प्यात सुभाष चौक ते कोंबडी बाजार रस्त्यावरील हॉकर्सचे स्थलांतर मुख्य टपाल कार्यालयासमोरील रस्त्यावर केले जाणार आहे.

Web Title: Counting of encroachments, encroachment of oats: adequate oats are available for the Hawkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.