‘स्थलांतरितांना नाकारणारे देश प्रगतीची संधी गमावतील’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 04:51 AM2020-01-23T04:51:31+5:302020-01-23T04:52:09+5:30
जगात तंत्रज्ञान उद्योगाची सतत वाढच होत असल्यामुळे जे देश स्थलांतरितांना आकर्षित करून घेण्यात अपयशी ठरतील त्यांना प्रगतीची संधी गमवावी लागेल, असा इशारा मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी दिला आहे.
नवी दिल्ली : जगात तंत्रज्ञान उद्योगाची सतत वाढच होत असल्यामुळे जे देश स्थलांतरितांना आकर्षित करून घेण्यात अपयशी ठरतील त्यांना प्रगतीची संधी गमवावी लागेल, असा इशारा मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी दिला आहे.
‘प्रत्येक देश आपल्या हिताचे काय आहे, याचा फेरविचार करीत आहे’, असे नाडेला यांनी मंगळवारी डाव्होस येथे एका मुलाखतीत म्हटले. ते म्हणाले, ‘तुमच्या देशात स्थलांतरितांचे स्वागत होते, असे जेव्हा लोकांना कळते तेव्हाच ते येतील.’
भारताने नुकत्याच संमत केलेल्या नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याबद्दल (सीएए) नाडेला यांनी या आधी काळजी व्यक्त करून कायदा दु:खद असल्याचे म्हटले होते. या कायद्याने शेजारच्या देशांतील दस्तावेज नसलेल्या स्थलांतरित मुस्लिमांना भारताचे नागरिकत्व मिळण्यास मनाई असून, इतर धर्मांतील स्थलांतरितांना मात्र नागरिकत्व दिले जाणार आहे.
सत्या नाडेला म्हणाले की, ‘तरीही मी आशावादी आहे. मी भारतीय आशावादी आहे. राष्ट्र उभारणीचा ७० वर्षांचा इतिहास आहे ही वस्तुस्थिती आहे.