देश-परदेश-सिंगापूर-निवडणूक
By Admin | Published: September 2, 2015 11:31 PM2015-09-02T23:31:42+5:302015-09-02T23:31:42+5:30
देश-परदेश-सिंगापूर-निवडणूक...२ सप्टेंबर २०१५
द श-परदेश-सिंगापूर-निवडणूक...२ सप्टेंबर २०१५सिंगापूरच्या निवडणूक आखाड्यात२१ उमदेवार मूळचे भारतीयएकूण ८१ रिंगणात : सत्तारूढ पक्षाची कसोटीसिंगापूर : पुढच्या आठवड्यात सिंगापूरमध्ये होणार्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान ली लुंग यांच्या सत्तारूढ पक्षाच्या ५० वर्षांच्या राजकीय वर्चस्वाची कसोटी लागणार आहे. निवडणुकीच्या आखाड्यात १८१ उमेदवार असून, यात मूळ भारतीय असलेल्या २१ उमेदवारांचाही समावेश आहे.११ सप्टेंबर रोजी होणार्या या निवडणुकीत नशीब अजमावणार्या मूळ भारतीय उमेदवारांत कायदा आणि विदेशमंत्री के. षण्मुगम, पंतप्रधान कार्यालयमंत्री एस. ईश्वरन आणि पर्यावरण व जलसंसाधनमंत्री व्हिव्हियन बालकृष्णन् यांचा समावेश आहे. हे सर्व दिग्गज सत्तारूढ पीपल्स ॲक्शन पार्टीचे उमेदवार आहेत.याशिवाय उपपंतप्रधान व वित्तमंत्री थरमन षण्मुगारत्नम आणि अर्थतज्ज्ञ केनेथ जयारेत्नम हेही नशीब अजमावात आहेत. हे दोघेही मूळचे श्रीलंकेचे आहेत. अध्यक्ष टोनी टॅन केग याम यांनी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार २५ ऑगस्ट रोजी बारावी संसद बरखास्त केल्याने मुदतपूर्व सार्वत्रिक निवडणुकीचा मार्ग प्रशस्त झाला.पीपल्स ॲक्शन पार्टीने ५० वर्षांपेक्षा अधिक काळ सत्ता गाजविली. ८९ सदस्यीय संसदेत सत्तारूढ पक्षाला पुन्हा बहुमत मिळविण्याची अपेक्षा असली तरी पक्ष संस्थापक आणि सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली कुआय येव यांचे मार्चमध्ये निधन झाल्याने या पक्षावर दबाव येऊ शकतो. कारण विदेशींचे वाढते लोंढे आणि जीवनमान खर्चिक झाल्याने नागरिकांत प्रचंड असंतोष आहे. १६ जीआरसी (ग्रुप रिप्रेझेंटेशन कॉन्स्टट्यिुयन्सी) आणि एक सदस्यीय मतदारसंघातून एकूण ८९ उमेदवार संसदेवर निवडून आणायचे आहेत. यासाठी सिंगापूरचे २.४६ दशलक्ष मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या सार्वत्रिक निवडणुकीचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे सिंगापुरात स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असतानाच ही निवडणूक होत आहे.