Coronavirus: देशातील विमानसेवा १४ एप्रिलपर्यंत बंद; मायदेशी परतलेले सर्व जण ‘क्वारंटाईन’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 03:49 AM2020-03-29T03:49:06+5:302020-03-29T03:49:11+5:30

पंतप्रधान मोदी यांनी १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला; त्यामुळे ही मुदत वाढविली आहे.

Country airlines closed until April 14; All those who returned home were 'quarantine' | Coronavirus: देशातील विमानसेवा १४ एप्रिलपर्यंत बंद; मायदेशी परतलेले सर्व जण ‘क्वारंटाईन’

Coronavirus: देशातील विमानसेवा १४ एप्रिलपर्यंत बंद; मायदेशी परतलेले सर्व जण ‘क्वारंटाईन’

Next

नवी दिल्ली : कोरोनामुळे देशामध्ये सध्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमानसेवेवर घातलेल्या बंदीची मुदत आता १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यानंतर या सेवा पूर्ववत सुरू होतील.

या संदर्भात नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले, की कोरोनाच्या साथीमुळे विदेशातून येणाऱ्या लोकांकडून तसेच देशातील लोकांकडूनही कोरोनाचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत प्रवासी विमान वाहतूक ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. परंतु, पंतप्रधान मोदी यांनी १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला; त्यामुळे ही मुदत वाढविली आहे.

जर्मनीतून भारतीयांना आणण्यासाठी ९ विमाने

नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे जर्मनीमध्ये अडकलेल्या हजारो भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडिया पुढील आठवड्यात ९ विशेष विमानसेवा चालविणार आहे.

जर्मनीच्या विविध शहरांमध्ये अडकलेल्या भारतीयांना आपल्या तेथील वकिलातीने फ्रँकफर्टमध्ये आणले आहे. एअर इंडिया ३१ मार्च ते ३ एप्रिलदरम्यान विशेष विमानांच्या एकूण ९ फेºया करून या लोकांना मुंबईत आणेल, असे सूत्रांनी सांगितले. ३१ मार्च रोजी पाच, दोन एप्रिल रोजी दोन व १ व ३ एप्रिल रोजी प्रत्येकी एक विमान जर्मनीला पाठविण्यात येईल.

या विशेष फेऱ्यांसाठी एअर इंडियाची बोर्इंग-७७७ व ७८७-८ (ड्रीमलायनर) ही सर्वांत मोठी विमाने वापरली जातील. याआधी एअर इंडियाने अशाच प्रकारे विशेष विमाने चालवून चीन (वुहान), इटली (रोम व मिलान) आणि जपानमध्ये अडकून पडलेल्या हजारो भारतीयांना मायदेशी परत आणले आहे. या सर्वांना विविध ठिकाणी ‘क्वारंटाईन’मध्ये ठेवण्यात आले आहे. गुरुवारी इस्राईलच्या तेल अविवमधून ३०० भारतीयांना आणण्यात आले होते.

Web Title: Country airlines closed until April 14; All those who returned home were 'quarantine'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.