देशात भयंकर तिरस्कार आणि क्रूरतेचे वातावरण, नसिरुद्दीन शाहांचे पुन्हा टीकास्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 10:03 PM2019-01-04T22:03:14+5:302019-01-04T22:04:45+5:30
भारतात राहताना आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता वाटते, असे वक्तव्य केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी देशातील परिस्थितीबाबत पुन्हा एकदा भाष्य केले आहे.
नवी दिल्ली - भारतात राहताना आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता वाटते, असे वक्तव्य केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी देशातील परिस्थितीबाबत पुन्हा एकदा भाष्य केले आहे. या देशात सध्या भयंकर तिरस्कार आणि क्रूरतेचे वातावरण आहे, अशी टीका केली आहे.
अॅम्नेस्टी इंडियाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर नसिरुद्दीन शाह यांचे हे वक्तव्य ट्विट करण्यात आले आहे. त्यात नसिरुद्दीन शाह म्हणतात की, ''सध्या या देशामध्ये भयंकर तिरस्कार आणि क्रूरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सरलेले वर्ष हे विचार स्वातंत्र्य आणि मानवाधिकारांची गळचेपी करणारे ठरले. आता नव्या वर्षात आपल्या घटनात्मक अधिकारांसाठी उभे राहण्याची आणि ही अंधाधुंदी संपवा, असे सरकारला बजावण्याची वेळ आली आहे.''
In 2018, India witnessed a massive crackdown on freedom of expression and human rights defenders. Let's stand up for our constitutional values this new year and tell the Indian government that its crackdown must end now. #AbkiBaarManavAdhikaarpic.twitter.com/e7YSIyLAfm
— Amnesty India (@AIIndia) January 4, 2019
दरम्यान, समाजात विष पसरल्यानं आता मला माझ्या मुलांची चिंता वाटते, असे विधान नसीरुद्दीन शाह यांनी केले होते. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात तथाकथित गोरक्षकांनी एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या केली होती. त्या घटनेवर भाष्य करताना शाह यांनी भारतातील सद्यस्थितीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. आता गाईचा जीवन माणसापेक्षा महत्त्वाचा झाला आहे, असा टोला त्यांनी लगावला होता.
या वक्तव्यावरून वाद झाल्यावर शाह यांनी त्यांच्या विधानाबद्दल स्पष्टीकरण दिले होते. मी देशद्रोही नाही. देशावर टीका करताना मला दु:ख होते. मात्र चुकीचे वाटल्यास त्यावर मी अवश्य बोलणार. मला देशाच्या भविष्याची चिंता वाटते. माझ्या 4 पिढ्या या देशात जन्मल्या. माझा जन्मदेखील याच देशात झाला. माझी मुलंदेखील इथंच राहणार आहेत. माझे देशावर खूप प्रेम आहे. मात्र त्यासाठी मला गोंधळ घालण्याची आवश्यकता वाटत नाही, असे त्यांनी म्हटले होते.
Days after triggering a controversy by speaking about his concerns over his children's safety in India, veteran actor Naseeruddin Shah has now alleged that "the country is awash with horrific hatred and cruelty."
— ANI Digital (@ani_digital) January 4, 2019
Read @ANI Story | https://t.co/A9DQDmHE4Epic.twitter.com/V3ETh70hGP