'देश आत्मनिर्भर होतोय, परवानगी मिळालेल्या दोन्ही लसी भारतातच तयार झाल्या'
By महेश गलांडे | Published: January 3, 2021 01:25 PM2021-01-03T13:25:07+5:302021-01-03T13:25:26+5:30
मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन देशात कोरोना लशीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिल्याचा आनंद व्यक्त केला. तसेच, भारत देश आत्मनिर्भर होत आहे, याचं हे पहिलं पाऊल असल्याचंही मोदींनी म्हटलं
नवी दिल्ली - गेल्या कित्येक महिन्यांपासून देशातील नागरिक ज्या कोरोना लसीच्या बातमीकडे डोळे आणि कान लावून बसले होते, ती कोरोना लस आता बाजारात उपलब्ध होणार आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयने दोन कोरोना प्रतिबंधात्मक लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. डीसीजीआयचे संचालक व्हीजी सोमाणी यांनी सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी देण्यात येत असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे या दोन्ही लशी भारतातच तयार झाल्या आहेत, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन देशात कोरोना लशीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिल्याचा आनंद व्यक्त केला. तसेच, भारत देश आत्मनिर्भर होत आहे, याचं हे पहिलं पाऊल असल्याचंही मोदींनी म्हटलं. देशात कोरोना लसीच्या परवानगीची आनंदी बातमी मराठमोळ्या डॉक्टरने अधिकृतपणे दिली, देशवासियांसाठी आणि महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. त्यामुळे, मोदींनीही आनंद व्यक्त करत वैज्ञानिकांनी देशवासीयांचं स्वप्न पूर्ण केल्याचं म्हटलंय.
'भारत आत्मनिर्भर होत आहे. कोरोनाच्या दोन लशींना नुकतीच DCGI कडून परवानगी मिळाली आहे. आपल्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन! भारतीयांचं अभिनंदन आणि आपल्या शास्त्रज्ञांनी केलेल्या मेहनतीबद्दल अभिनंदन. या लशीमध्ये स्वदेशी लस असून भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हिशिल्ड ही लस आहे.आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आलेल्या दोन लसी भारतात तयार झाल्या आहेत, याचा प्रत्येकाला अभिमान वाटेल! काळजी आणि करुणेचे मूळ असलेल्या आत्मनिर्भर भारताचे स्वप्न आपल्या वैज्ञानिकांनी पूर्ण केलं, असं मोदींनी आपल्या संदेशात म्हटलंय.
यह गर्व की बात है कि जिन दो वैक्सीन के इमरजेंसी इस्तेमाल को मंजूरी दी गई है, वे दोनों मेड इन इंडिया हैं। यह आत्मनिर्भर भारत के सपने को पूरा करने के लिए हमारे वैज्ञानिक समुदाय की इच्छाशक्ति को दर्शाता है। वह आत्मनिर्भर भारत, जिसका आधार है- सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया।
— Narendra Modi (@narendramodi) January 3, 2021
शनिवारीच कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींना सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO)च्या कोरोनावरच्या तज्ज्ञ समितीने मान्यता दिली होती. त्यानंतर आता डीसीजीआयकडून परवानगी मिळाली आहे. सोबतच कॅडीलाच्या लसीला तिसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल करायलाही परवानगी देण्यात आली आहे. सीरम आणि भारत बायोटेकच्या या दोन्ही लसी 2 ते 8 डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवण्यात येऊ शकतात, असे डीसीजीआयने म्हटले आहे. तसेच, थोडा ताप, वेदना आणि अलर्जी असे परिणाम प्रत्येक लसींमध्ये असतात. या दोन्ही लसी ११० टक्के सुरक्षित आहेत, असे व्हीजी सोमाणी यांनी सांगितलं.
विपरीत परिस्थितियों में असाधारण सेवा भाव के लिए हम डॉक्टरों, मेडिकल प्रोफेशनल्स, वैज्ञानिकों, पुलिसकर्मियों, सफाईकर्मियों और सभी कोरोना वॉरियर्स के प्रति कृतज्ञता व्यक्त करते हैं। देशवासियों का जीवन बचाने के लिए हम सदा उनके आभारी रहेंगे।
— Narendra Modi (@narendramodi) January 3, 2021