देश-अवश्य यापुढे नौदलातही महिला अधिकार्यांना स्थायी कमिशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2015 11:49 PM2015-09-04T23:49:56+5:302015-09-04T23:49:56+5:30
नवी दिल्ली : लष्कर आणि हवाई दलापाठोपाठ आता भारतीय नौदलातील महिला अधिकार्यांनाही स्थायी कमिशन मिळेल. शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या एका महत्त्वपूर्ण निकालाद्वारे महिला अधिकार्यांना नौदलात स्थायी कमिशन देण्यावर मोहोर लावली.
न ी दिल्ली : लष्कर आणि हवाई दलापाठोपाठ आता भारतीय नौदलातील महिला अधिकार्यांनाही स्थायी कमिशन मिळेल. शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या एका महत्त्वपूर्ण निकालाद्वारे महिला अधिकार्यांना नौदलात स्थायी कमिशन देण्यावर मोहोर लावली.न्यायालयाच्या या आदेशानंतर महिला अधिकारीही आपल्या पुरुष सहकार्यांप्रमाणेच नौदलातून सेवानिवृत्त होतील आणि त्यांना पेन्शन व अन्य निवृत्ती लाभ मिळतील. आतापर्यंत नौदल महिलांना केवळ शॉर्ट सर्व्हिस कमिशन मिळत होते आणि केवळ प्रशासकीय, आरोग्य व शैक्षणिक विभागातच त्यांना तैनात केले जात होते.लष्कर व हवाई दलाच्या महिला अधिकार्यांना 2010 मध्ये स्थायी कमिशन मिळाल्यानंतर नौदलाच्या 19 महिला अधिकार्यांनी स्थायी कमिशनच्या मागणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. नौदलातील महिला अधिकार्यांना स्थायी कमिशनपासून वंचित ठेवणे ‘लैंगिक भेदाभेद’ असल्याचे या महिलांनी आपल्या याचिकेत म्हटले होते. न्या. कैलाश गंभीर आणि न्या. नज्मी वजिरी यांच्या खंडपीठाने या महिला अधिकार्यांची विनंती मान्य केली.