देशात सप्टेंबरच्या मध्यापर्यंत कोरोना संपण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 05:22 AM2020-06-08T05:22:31+5:302020-06-08T05:22:42+5:30
गणिती मॉडेलचा घेतला आधार : आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांचा दावा
नवी दिल्ली : देशामध्ये सुरू असलेली कोरोनाची साथ सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत संपण्याची शक्यता आहे, असे केंद्रीय आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण खात्यातील सार्वजनिक आरोग्य या विभागाचे उपमहासंचालक डॉ. अनिलकुमार व कुष्ठरोग निवारण विभागाच्या उपसहायक संचालक रूपाली रॉय यांनी एपिडेमिआॅलॉजी इंटरनॅशनल जर्नलमध्ये लिहिलेल्या लेखात हे मत मांडले आहे. त्यासाठी लेखकद्वयाने बेली मॉडेलचा आधार घेतला आहे.
एखाद्या टप्प्यात कोरोनाचा किती लोकांना संसर्ग झाला व त्यातून किती जण बरे झाले, याचा बेली मॉडेलमध्ये विचार करण्यात येतो. ज्यावेळी संसर्ग झालेले रुग्ण व संसर्गातून पूर्णपणे बरे झालेल्या व्यक्ती यांची संख्या समान होते, त्यावेळी त्या साथीने कळस गाठला आहे, असे समजले जाते. त्यानंतर ही साथ पूर्णपणे ओसरते, असे संशोधक मानतात. एकूण रुग्णांमध्ये किती जण पूर्णपणे बरे झाले आहेत, त्यांची टक्केवारी काढली जाते. रुग्ण संख्या व आजारातून बरे होणाºयांचे प्रमाण शोधण्यासाठी या टक्केवारीचा उपयोग होतो.
साथीच्या फैलावाचे मापन
बेली मॉडेलचा वापर कोणत्याही साथीच्या फैलावाचा अभ्यास करण्यासाठी केला जातो. ही साथ एक दिवस कळसाला पोहोचते. तिच्या रुग्णांपैकी किती जण बरे झाले किंवा मरण पावले यांच्या मोजदादीला रिलेटिव्ह रिमूव्हल रेट (आरआरआर) असे म्हणतात. बेली मॉडेलद्वारे १९ मेला कोरोना साथीच्या स्थितीचा अभ्यास करण्यात आला.
त्यावेळी आरआरआरचे प्रमाण
42%
टक्के होते ते आता ५० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
ते सप्टेंबरच्या मध्यापर्यंत
100%
पर्यंत पोहोचणार आहे. साथीने किती कळस गाठला आहे, हे आरआरआरच्या प्रमाणावरून कळू शकते. साथीच्या नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनांचे ते फलित आहे.