संरक्षणासाठी देश पूर्णपणे सज्ज- स्वराज यांची ग्वाही लोकसभेत मुद्दा : चीन-पाकिस्तान अणुकरारामुळे सरकार चिंतित

By Admin | Published: December 18, 2014 12:40 AM2014-12-18T00:40:40+5:302014-12-18T00:40:40+5:30

नवी दिल्ली : चीन आणि पाकिस्तानमधील अणुकरारामुळे सरकार चिंतित असून आम्ही हा मुद्दा चीनकडे उपस्थित केला आहे, तथापि भारताने स्वत:चे हित जपण्यासाठी पूर्णपणे तयारी केलेली आहे. आम्ही पूर्णपणे सतर्क आहोत. धमक्या हाणून पाडण्याची पूर्ण तयारी आहे, देशाला कोणतीही झळ पोहोचणार नाही, अशी ग्वाही विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

The country is fully prepared for protection: Swaraj's assertion in the Lok Sabha issue: Government worried over China-Pakistan nuclear deal | संरक्षणासाठी देश पूर्णपणे सज्ज- स्वराज यांची ग्वाही लोकसभेत मुद्दा : चीन-पाकिस्तान अणुकरारामुळे सरकार चिंतित

संरक्षणासाठी देश पूर्णपणे सज्ज- स्वराज यांची ग्वाही लोकसभेत मुद्दा : चीन-पाकिस्तान अणुकरारामुळे सरकार चिंतित

googlenewsNext
ी दिल्ली : चीन आणि पाकिस्तानमधील अणुकरारामुळे सरकार चिंतित असून आम्ही हा मुद्दा चीनकडे उपस्थित केला आहे, तथापि भारताने स्वत:चे हित जपण्यासाठी पूर्णपणे तयारी केलेली आहे. आम्ही पूर्णपणे सतर्क आहोत. धमक्या हाणून पाडण्याची पूर्ण तयारी आहे, देशाला कोणतीही झळ पोहोचणार नाही, अशी ग्वाही विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.
या दोन देशांमधील अणुकरारांमुळे देश सतर्क झाला असून चीनची संयुक्त राष्ट्रासारख्या जागतिक संघटनेकडे तक्रार करण्याजोगी कोणतीही परिस्थिती उद्भवलेली नाही. देशाचे सुरक्षाहित जपण्यासाठी सवार्ेपरी पावले उचलण्यास सरकार कटिबद्ध आहे. प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्यांनी पाकिस्तानकडून अणुहल्ला होण्याच्या धोक्याबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यासंबंधी पूरक प्रश्नाला उत्तर देताना स्वराज म्हणाल्या की, चीनने आतापर्यंत पाकिस्तानसोबत तीन अणुकरार केले असल्याची माहिती सरकारला आहे. या करारामुळे जागतिक नि:शस्त्रीकरणावर होणाऱ्या परिणामांबाबत सरकारची चिंता कायम आहे. अण्वस्त्र नि:शस्त्रीकरणाबाबत या देशांनी कराराचे पालन करावे असे सरकारला वाटते.
-----------------------
तिसरा करार...
चीन आणि पाकिस्तानने १९८६ मध्ये पहिला अणुकरार केला तेव्हा चश्मा एक आणि चश्मा दोन अणुभट्ट्या लावण्याचा मुद्दा समाविष्ट होता. २००१ मध्ये झालेल्या दुसऱ्या चश्मा तीन आणि चश्मा चार अणुभट्ट्या लावण्यासंबंधी करार झाला होता. आता आणखी अणुकरार झाल्याची माहिती मिळाली आहे. आम्ही हा मुद्दा चीनकडे उपस्थित केला आहे. हा करार आंतरराष्ट्रीय उत्तरदायित्वाला अनुसरून आहे. या कराराचा अवलंब केवळ शांततापूर्ण कार्यासाठी केला जात आहे, असा खुलासा चीनने केल्याची माहिती स्वराज यांनी दिली.

Web Title: The country is fully prepared for protection: Swaraj's assertion in the Lok Sabha issue: Government worried over China-Pakistan nuclear deal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.