देशाला विकासासाठी पंचसूत्रीची गरज; तरच अर्थव्यवस्था सुधारेल- नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 08:43 AM2020-07-05T08:43:04+5:302020-07-05T08:43:22+5:30
केंद्र सरकारचे लक्ष्य भारताला 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनविणे आहे. त्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
फरिदाबादः देशाला विकासासाठी पंचसूत्रीची गरज असून, ती उपलब्ध झाल्यास अर्थव्यवस्था सुधारेल, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. मानव रचना शैक्षणिक संस्था येथे इंडिया वेबलॉगचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नितीन गडकरी बोलत होते. ते म्हणाले की, केंद्र सरकारचे लक्ष्य भारताला 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनविणे आहे. त्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
कामगार, जमीन, कायदा, रसद आणि तरलता या पाच मुख्य मुद्द्यांवर काम करण्याची गरज आहे. ही पंचसूत्री देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल. चीनची लॉजिस्टिक किंमत 8 टक्के, भारताची 13 टक्के आणि अमेरिकेची 12 टक्के आहे, ती कशी कमी करावी याचा विचार केला पाहिजे.
1947पूर्वी आणि नंतर देशाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. देशातील नागरिकांनी नेहमीच सकारात्मक ऊर्जेनं अशा आव्हानांचा सामना केला. सरकारने जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांचे मदत पॅकेजमुळे अर्थव्यवस्थेच्या प्रगतीला हातभार लागणार आहे.
India has got a huge market, skilled manpower, availability of raw material, govt is pro-development and pro-industry because we want to create more employment potential and eradicate poverty: Union Minister Nitin Gadkari at Aatmanirbhar Bharat web dialogue (04.07.2020) https://t.co/lwBFe7zUfK
— ANI (@ANI) July 5, 2020
ज्यांच्याकडे भाकरी, कपडे आणि घरे नाहीत त्यांच्यासाठी सरकारने धोरण आखले पाहिजे. उद्योग, स्मार्ट शहरे आणि स्मार्ट व्हिलेज स्थापित करण्यासाठी सुमारे 115 जिल्ह्यांशी चर्चा केली आहे, असंही नितीन गडकरींनी स्पष्ट केलं आहे. सरकारचं धोरण विकासवादी आहे. गरिबी हटवण्यासाठी आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्यावे लागतील. जास्त उत्पादन करणे आणि अधिकाधिक लोकांना रोजगार देण्यावर मला नेहमीच विश्वास आहे. ते म्हणाले की, आजच्या काळात लोक खूप नकारात्मक झाले आहेत, त्यांना सकारात्मक, आनंदी, समृद्ध आणि सक्षम बनले पाहिजे, असंही गडकरींनी सांगितलं आहे.
हेही वाचा
मोदींच्या शुभेच्छांवर ट्रम्प म्हणाले; "थँक्यू माझ्या मित्रा, अमेरिका भारतावर प्रेम करतो"
मुसळधार पावसानं लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हर फ्लो; संततधार कायम