देशात गंभीर रुग्णांचे प्रमाण आटोक्यात, ७१६ रुग्ण आतापर्यंत बरे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 06:49 AM2020-04-13T06:49:24+5:302020-04-13T06:50:22+5:30

६०१ रुग्णालयांमध्ये १ लाख ५ हजारांपेक्षा जास्त खाटा सज्ज; बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले

In the country, the proportion of serious patients is estimated, 3 patients so far | देशात गंभीर रुग्णांचे प्रमाण आटोक्यात, ७१६ रुग्ण आतापर्यंत बरे

देशात गंभीर रुग्णांचे प्रमाण आटोक्यात, ७१६ रुग्ण आतापर्यंत बरे

Next

नवी दिल्ली : रुग्णसंख्या वाढत असली तरी गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी आहे. त्यांच्यावर उपचारासाठी रुग्णालये सज्ज असून अशा रुग्णांच्या तुलनेत बेड, आयसीयू व व्हेंटिलेटरची संख्या खूप जास्त असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. सद्य:स्थितीत एकूण २० टक्के रुग्ण गंभीर आहेत. अशांची संख्या १ हजार ६७१ आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी स्पष्ट केले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते आहे. एकूण ७१६ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. श्वसनास अडथळा येतो, व्हेंटिलेटर लावावे लागते असे रुग्ण गंभीर श्रेणीत येतात. अशांची संख्या १६७१ आहे.

२९ मार्चला देशात ९७९ रुग्ण होते. त्यांच्यापैकी १८६ जण गंभीर होते. त्या वेळी राज्यांमधील १६३ डेडिकेटेड कोविड रुग्णालयांमध्ये १४,९०० बेड्स उपलब्ध होते. ११ एप्रिलला गंभीर रुग्णांची संख्या १६७१ वर पोहोचली. मात्र त्यासाठी ६०१ डेडिकेटेड कोविड रुग्णालयांमध्ये १ लाख ५ हजारांपेक्षा जास्त बेड्स सज्ज आहेत. एम्स, सफदरजंग, मुंबईच्या सेव्हन हिल्स रुग्णालयाचे उदाहरण त्यांनी दिले. एम्समध्ये २५० बेड्स तयार असून त्यातील ५० आयसीयू बेड्स आहेत. सफदरजंगमध्ये ही संख्या ५०० असून १०० आयसीयू बेड्स आहेत. लष्कराने दहा शहरांमधील रुग्णालयात ९ हजार बेड्स तयार केले आहेत. आॅर्डनन्स फॅक्टरीने ५० टेंट्स सज्ज ठेवले असून त्यात एकावेळी दोन जणांवर उपचार होऊ शकतील. ४८ तासांमध्ये ७४ जण कोरोनातून पूर्ण बरे झाले आहेत.

देशात ९१८ रुग्ण : गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ९१८ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या ९,२०४ वर गेली आहे. यापैकी २ हजार रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. आतापर्यंत या संसर्गजन्य आजाराने भारतात ३२९ जण मरण पावले आहेत.

राज्यातील नव्या २२१ रुग्णांपैकी १५२ जण मुंबईतील
च्राज्यात रविवारी कोरोनाच्या २२१ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यातील १५२ रुग्ण मुंबईतील असून आता राज्याची एकूण रुग्णसंख्या २ हजार २७ झाली आहे. राज्यात रविवारी २५ मृत्यूंची नोंद झाली असून त्यातील १६ मृत्यू मुंबईतील आहेत. राज्याचा कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही १५२ वर पोहोचला आहे.
च्आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४१ हजार १०९ नमुन्यांपैकी ३७ हजार ९६४ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २१७ कोरोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ६१ हजार २४७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ५०६४ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या राज्यात १६१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

Web Title: In the country, the proportion of serious patients is estimated, 3 patients so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.