‘सीडीएस बिपिन रावत यांच्या जाण्याने देश दु:खी, मात्र थांबणार नाही, ते जिथे असतील तिथून आम्हाला पुढे जाताना बघतील’, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं विधान      

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 04:00 PM2021-12-11T16:00:22+5:302021-12-11T16:01:10+5:30

CDS Bipin Rawat: देशाचे पहिले चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत  यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. दरम्यान, पंतप्रधान Narendra Modi यांनी बिपिन रावत यांच्या निधनाबाबत प्रथमच जाहीर सभेमधून भाष्य केलं आहे.

"The country is saddened by the departure of CDS Bipin Rawat, but it will not stop. They will see us moving forward from wherever they are," said Prime Minister Narendra Modi. | ‘सीडीएस बिपिन रावत यांच्या जाण्याने देश दु:खी, मात्र थांबणार नाही, ते जिथे असतील तिथून आम्हाला पुढे जाताना बघतील’, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं विधान      

‘सीडीएस बिपिन रावत यांच्या जाण्याने देश दु:खी, मात्र थांबणार नाही, ते जिथे असतील तिथून आम्हाला पुढे जाताना बघतील’, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं विधान      

Next

नवी दिल्ली - देशाचे पहिले चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत  यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिपिन रावत यांच्या निधनाबाबत प्रथमच जाहीर सभेमधून भाष्य केलं आहे. मोदी म्हणाले की, बिपिन रावत यांच्या निधनामुळे देशभक्त दु:खी आहेत. आज मी ८ डिसेंबर रोजी झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत हुतात्मा झालेल्या सर्व वीरांना श्रद्धांजली अर्पण करतो. देशाचे पहिले चिफ ऑफ डिफेन्स स्टाफबिपिन रावत यांचे जाणे देशप्रेमी, प्रत्येक देशभक्तासाठी मोठी हानी आहे. ते खूप शूर होते. संपूर्ण देश त्यांच्या परिश्रमांचा साक्षीदार आहे.

मोदी म्हणाले की, आज भारत देश दु:खी आहे. मात्र वेदना सहन करताना आपण गती वा प्रगती रोखत नाही. आता भारत थांबणार नाही. आम्ही भारतीय खूप मेहनत करू. देशाच्या आतील आणि बाहेरील प्रत्येक आव्हानाचा सामना करू. भारताला अजून शक्तिशाली करू.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाच्या सीमांचे रक्षण वाढवण्याचे काम बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चरला भक्कम करण्याचे काम आमि देशाच्या सैन्यदलांना आत्मनिर्भर बनवण्याचे अभियान. तसेच तिन्ही सैन्यदलांमध्ये चांगला ताळमेळ राखण्याचे काम, अशी अनेक कामे ही वेगाने पूर्ण केली जातील. यावेळी मृत्यूशी झुंजत असलेल्या वरुण यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठीही मोदींनी प्रार्थना केली. ते म्हणाले, उत्तर प्रदेशमधील देवरिया येथील राहणारे ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टर जीवतोड मेहनत घेत आहेत. मी आई पाटेश्वरीकडे त्यांच्या जीविताच्या रक्षणासाठी प्रार्थना करतो. तसेच या अपघाता आम्ही ज्या वीरांना गमावले. त्यांच्यासोबत आमच्या संवेदना आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशमधील बलरामपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शरयू नदी राष्ट्रीय योजनेचे उदघाटन केले. या योजनेमधून १४ लाख हेक्टरपेक्षा अधिक जमिनीच्या सिंचनासाठी पाणी मिळेल. तसेच सुमारे १९ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. 
 

Web Title: "The country is saddened by the departure of CDS Bipin Rawat, but it will not stop. They will see us moving forward from wherever they are," said Prime Minister Narendra Modi.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.