'देशाला गांधी घराण्याचे गैरव्यवहार कळले पाहिजेत'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 03:47 AM2018-09-12T03:47:41+5:302018-09-12T03:47:56+5:30

नॅशनल हेरॉल्डप्रकरणी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणींनी राहुल गांधींवर पुन्हा एकदा आरोपांचा भडिमार केला आहे.

'The country should know the racket of Gandhi family' | 'देशाला गांधी घराण्याचे गैरव्यवहार कळले पाहिजेत'

'देशाला गांधी घराण्याचे गैरव्यवहार कळले पाहिजेत'

Next

नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्डप्रकरणी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणींनी राहुल गांधींवर पुन्हा एकदा आरोपांचा भडिमार केला आहे.
इराणी म्हणतात, काँग्रेसचे मुखपत्र नॅशनल हेरॉल्ड यंग इंडिया कंपनी प्रकाशित करते; मात्र कंपनीचा इरादा वृत्तपत्र चालवण्याचा दिसत नाही. राहुल गांधींच्या असोसिएट जर्नल्सने ५० लाख देऊन ९० कोटींचे कर्ज उचलले. आयकर नियमांचे उल्लंघन केले. प्रसारमाध्यमांमध्ये सदर प्रकरणाच्या बातम्या प्रसिद्ध होऊ नयेत यासाठी न्यायालयावरही दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
>बँंकिंग व्यवस्थेतील थकलेल्या (एनपीए) कर्जाच्या महासंकटासाठी काँग्रेसवर इराणी यांनी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या वक्तव्याच्या आधारे जोरदार हल्ला केला. राजन यांनी २००६ ते २००८ दरम्यान यूपीएच्या लोकांनी बँकिंग व्यवस्थेत एनपीएला वाढू दिले, असे म्हटले होते.

Web Title: 'The country should know the racket of Gandhi family'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.