देशाच्या अनेकत्वाचे स्वरूप कमजोर होऊ नये -राष्ट्रपती

By admin | Published: April 11, 2015 01:03 AM2015-04-11T01:03:12+5:302015-04-11T01:03:12+5:30

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत अलीकडच्या काळात ईशान्य राज्यातील युवकांवर झालेल्या हल्ल्यांचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी निषेध केला आहे.

The country should not weaken the scope of multiplicity - the President | देशाच्या अनेकत्वाचे स्वरूप कमजोर होऊ नये -राष्ट्रपती

देशाच्या अनेकत्वाचे स्वरूप कमजोर होऊ नये -राष्ट्रपती

Next

ऐझवाल : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत अलीकडच्या काळात ईशान्य राज्यातील युवकांवर झालेल्या हल्ल्यांचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी निषेध केला आहे. अशा प्रकारच्या अस्वीकारणीय घटनांमुळे राष्ट्राच्या अनेकत्वाचे स्वरूप कमजोर होता कामा नये, असे मुखर्जी यांनी म्हटले आहे.
मिझोरम विद्यापीठाच्या १० व्या दीक्षांत समारंभात मुखर्जी बोलत होते. ते म्हणाले, केंद्र सरकार आणि दिल्ली प्रशासनाने आरोपींना केवळ अटकच केलेली नाही, तर अशा हल्ल्यांच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी उपाययोजनाही केल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी दिल्लीत अशा दुर्दैवी घटना घडल्या होत्या; परंतु अशा घटनांमुळे आपल्या ऐक्याची वीण उसवणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. (वृत्तसंस्था)

Web Title: The country should not weaken the scope of multiplicity - the President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.