देश हळूहळू तिसऱ्या लाटेच्या पकडीत; १२ राज्यांमध्ये कोरोनात झपाट्याने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 02:25 PM2021-09-20T14:25:43+5:302021-09-20T14:26:00+5:30

१२ राज्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत, देशाच्या विविध भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण हळूहळू वाढू लागले आहेत.

The country is slowly catching the third wave; Rapid increase in corona in 12 states | देश हळूहळू तिसऱ्या लाटेच्या पकडीत; १२ राज्यांमध्ये कोरोनात झपाट्याने वाढ

देश हळूहळू तिसऱ्या लाटेच्या पकडीत; १२ राज्यांमध्ये कोरोनात झपाट्याने वाढ

Next

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर, नवीन प्रकरणांमध्ये पुन्हा वाढ होऊ लागली आहे. सलग चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या ३० हजारांच्या पुढे गेली आहे. कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ हे तिसऱ्या लाटेचे लक्षण असल्याचे तज्ज्ञ सांगतात. गेल्या २४ तासांत देशात कोरोना विषाणूची ३०,७७३ नवीन प्रकरणे समोर आली आहेत, तर ३०९ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, ३८,९४५  संक्रमित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

१२ राज्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत, देशाच्या विविध भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण हळूहळू वाढू लागले आहेत. सुमारे डझन राज्यांमध्ये, कोरोनाची दैनंदिन प्रकरणे एक हजाराच्या वर येत आहेत. यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाली आहे. तज्ज्ञांनी सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात तिसरी लाट येण्याचा अंदाजही व्यक्त केला होता. अशा परिस्थितीत देश हळूहळू तिसऱ्या लाटेच्या पकडीत येत आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मिझोरामसह अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा वेग वाढत आहे. केरळ अजूनही कोरोनाचे हॉटस्पॉट आहे. राज्यात दररोज २० हजारांहून अधिक नवीन संक्रमित रुग्ण बाहेर येत आहेत.

  गेल्या २४ तासांमध्ये एकूण नवीन प्रकरणे आली - गेल्या २४ तासांमध्ये ३०,७७३ हजार बरे झाले - ३८,९४५ हजार एकूण मृत्यू - ३०९ झाले. गेल्या २४ तासांमध्ये - ८४.४२ लाख लसी देण्यात आल्या. 

  आतापर्यंत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ३.३२ लाख असून एकूण संक्रमित लोकांची संख्या ३.३४ कोटी आहे. एकूण ३.२६ लोक आतापर्यंत बरे झाले आहेत. मृत्यू आतापर्यंत ४,४४ लाख झाले असून एकूण कोरोना लस - ८०.४३ कोटी  देण्यात आल्या. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या मते १८ सप्टेंबरपर्यंत एकूण ५५,२३,४०,१६८ नमुने चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर शनिवारी (१८ सप्टेंबर) १५ लाख ५९ हजारांहून अधिक लोकांचे नमुने घेण्यात आले.
 

Web Title: The country is slowly catching the third wave; Rapid increase in corona in 12 states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.