'यंदा स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष, तिरंग्याचा अपमान पाहून देश दु:खी झाला'; मोदींची 'मन की बात'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 12:07 PM2021-01-31T12:07:56+5:302021-01-31T12:09:58+5:30
Man ki baat: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिलेल्या अभिभाषणानंतर संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. क्रिकेटच्या मैदानातूनही या महिन्यात खूप चांगली बातमी मिळाली. आपल्या टीमने सुरुवातीला अनेक अडचणी झेलल्या त्यातून सावरले. मात्र, ऑस्ट्रेलियाला नमवून आले. आपल्य़ा खेळाडूंचे hard work आणि teamwork प्रेरित करणारे आहे, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातद्वारे देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी 26 जानेवारीला लाल किल्ल्यावर झालेल्या तिरंग्याच्या अपमानावरही भाष्य केले. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशन, कोरोना लस आदीवरही कटाक्ष टाकला.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिलेल्या अभिभाषणानंतर संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. यामध्ये आणखी एक कार्य संपन्न झाले. ते म्हणजे पद्म पुरस्कारांचे वितरण. यामध्ये ज्या लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात चांगले काम केले त्यांचा समावेश आहे. क्रिकेटच्या मैदानातूनही या महिन्यात खूप चांगली बातमी मिळाली. आपल्या टीमने सुरुवातीला अनेक अडचणी झेलल्या त्यातून सावरले. मात्र, ऑस्ट्रेलियाला नमवून आले. आपल्य़ा खेळाडूंचे hard work आणि teamwork प्रेरित करणारे आहे, असे मोदी म्हणाले.
In sabzi mandis, vegetables rot due to multiple reasons spreading unhygienic conditions. However, traders at Hyderabad's Bowenpally Sabzi Mandi decided to produce electricity out of waste vegetables. This is the power of innovation: PM Narendra Modi during 'Mann Ki Baat' pic.twitter.com/J9vqeBGlQK
— ANI (@ANI) January 31, 2021
26 जानेवारीला दिल्लीमध्ये हिंसाचार झाला. यादिवशी तिरंग्याचा झालेला अपमान पाहून देश खूप दु:खी झाला. कोरोना काळात भारताने दिलेली लढाई जगासमोर एक आदर्श असताना आता लसीकरणही त्याच वाटेवर आहे. भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम सुरु आहे.
स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव
हे वर्ष भारतासाठी खूप महत्वाचे आहे. कारण यंदा स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव म्हणजेच 75 वे वर्ष सुरु होत आहे. आपल्या महानायकांशी संबंधित ठिकाणांची माहिती घेण्यासाठी योग्य वेळ आहे. मुंगेरच्या जयराम विप्लव यांनी तारापुर शहीद दिवसावर लिहिले आहे, त्यांचा धन्यवाद, असे मोदी म्हणाले.
Made in India vaccine is not only a symbol of Atmanirbhar Bharat but it is also a symbol of its self-pride: Prime Minister Narendra Modi
— ANI (@ANI) January 31, 2021
स्ट्रॉबेरी ती देखील बुंदेलखंडमध्ये?
गेल्या काही दिवसांत झाशीमध्ये Strawberry Festival सुरु झाला आहे. अनेकांना आश्चर्य वाटू लागले आहे, स्ट्रॉबेरी ती देखील बुंदेलखंडमध्ये? पण हे खरे आहे. नवीन तंत्रज्ञानाद्वारे अनेक ठिकाणी असे प्रयोग होत आहेत. आता स्ट्रॉबेरी कच्छच्या वाळवंटातही पिकू लागली आहे, असे मोदी म्हणाले.
मोदी यांनी सांगितले की, शेतकरी आणि तरुणांना त्यांच्या घराच्या मागील रिकामी जागा, छतावर, गार्डनमध्ये स्ट्रॉबेरी उगविण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. शेतीला आधुनिक बनविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. अनेक पाऊले उचलत आहे. यापुढेही हे प्रयत्न सुरु राहतील.