देश आपलं बलिदान विसरणार नाही, शहीद कुटुंबीयांबद्दल मोदींकडून शोक व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 06:40 PM2021-11-13T18:40:10+5:302021-11-13T18:41:19+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घटनेबद्दल शोक व्यक्त करत दु:ख व्यक्त केलं आहे. मणीपूरच्या आसाम रायफल दलातील कमांडिंग ऑफिसर शेखन यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो

The country will not forget its sacrifice, Modi expressed grief over the families of martyrs aasam rafiles in manipur | देश आपलं बलिदान विसरणार नाही, शहीद कुटुंबीयांबद्दल मोदींकडून शोक व्यक्त

देश आपलं बलिदान विसरणार नाही, शहीद कुटुंबीयांबद्दल मोदींकडून शोक व्यक्त

Next
ठळक मुद्देदहशतवाद्यांच्या या हल्ल्यात कमांडिंग अधिकारी कर्नल विप्लव त्रिपाठी त्यांची पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला. तर क्यूआरटीमध्ये तैनात असलेल्या चार जवानांना वीरमरण आले.

इंफाळ - मणिपूरमध्ये आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर आणि त्यांच्या कुटुंबावर अतिरेक्यांनी दबा धरून भ्याड हल्ला केला. हा हल्ला शनिवारी सकाळी १० वाजता शेखन-बेहिआंग पोलिस स्थानक परिसरामध्ये झाला. मिळालेल्या माहितीनुसार ४६ आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर त्यांचे कुटुंबीय आणि क्यूआरटीसोबत जात असताना अतिरेक्यांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन शहीद कुटुंबीयांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घटनेबद्दल शोक व्यक्त करत दु:ख व्यक्त केलं आहे. मणीपूरच्या आसाम रायफल दलातील कमांडिंग ऑफिसर शेखन यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. शहीद जवान आणि कुटुंबीयांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. आपलं बलिदान कधीच विसरता येणार नाही, असेही मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  

दरम्यान, दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात कमांडिंग अधिकारी कर्नल विप्लव त्रिपाठी त्यांची पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला. तर क्यूआरटीमध्ये तैनात असलेल्या चार जवानांना वीरमरण आले. (Terror Attack on 46 Assam Rifles Commanding officer)

मुख्यमंत्री बीरनेसिंह यांच्याकडूनही शोक व्यक्त

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे. हे अमानवीय आणि दहशतवादी क्रृत्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच अशा प्रकारचे भ्याड कृत्य करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. असा इशारा दिला आहे. दरम्यान, इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, क्विक रिअॅक्शन टीमसोबत अधिकाऱ्याच्या कुटुंबातील सदस्यही या ताफ्यामध्ये होते. दरम्यान, या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांबाबत अध्याप पूर्ण माहिती समोर आलेली नाही, आता याबाबतची अधिक माहिती घेतली जात आहे.

Web Title: The country will not forget its sacrifice, Modi expressed grief over the families of martyrs aasam rafiles in manipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.