कर्मचारी कपात! देशातील सर्वात मोठी विमान कंपनी हवालदिल; 10 टक्के नोकऱ्या जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 07:34 PM2020-07-20T19:34:14+5:302020-07-20T19:35:43+5:30

31 मार्च 2019 पर्यंत कंपनीत एकूण 23531 कर्मचारी होते. कोरोनामुळे हवाई क्षेत्र लॉकडाऊन झाल्याने मोठा परिणाम झाला आहे. देशात एकूण दोन महिने पूर्णपणे उड्डाणे बंद राहिली होती.

country's largest airline GO Indigo Cuts 10 percent jobs in corona Crisis | कर्मचारी कपात! देशातील सर्वात मोठी विमान कंपनी हवालदिल; 10 टक्के नोकऱ्या जाणार

कर्मचारी कपात! देशातील सर्वात मोठी विमान कंपनी हवालदिल; 10 टक्के नोकऱ्या जाणार

Next

एअर इंडिया पाच वर्षे कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविणार असल्याने आधीच तणावात असलेल्या हवाई क्षेत्राला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. खासगी क्षेत्रातील मोठी कंपनी 10 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. 


कोरोना महामारीमुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडलेली देशाची सर्वात मोठी कंपनी गो इंडिगो 10 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. कंपनीचे सीईओ रणजय दत्ता यांनी आज याची माहिती  दिली आहे. कंपनी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी कंपनीला काही त्याग करावा लागणार आहे. सर्व उपाय़ांवर विचार केल्यानंतर आम्ही 10 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले. 


दत्ता यांनी सांगितले की, कंपनीच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे. 31 मार्च 2019 पर्यंत कंपनीत एकूण 23531 कर्मचारी होते. कोरोनामुळे हवाई क्षेत्र लॉकडाऊन झाल्याने मोठा परिणाम झाला आहे. देशात एकूण दोन महिने पूर्णपणे उड्डाणे बंद राहिली होती. 25 मे पासून काही प्रमाणात विमाने सुरु झाली. मात्र, व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी मोठा वेळ लागणार आहे. 


एक प्रवासी दोन सीट
इंडिगोना कोरोनाचे संक्रमन रोखण्यासाठी एक योजना सुरु केली आहे. यामध्ये कोरोना व्हायरसमध्ये अतिरिक्त सुरक्षा मिळू शकते. यासाठी एक प्रवासी त्याच्याच नावावर दोन सीट बुक करू शकतो. विमान कंपनीने एका वक्तव्यामध्ये म्हटले आहे की, अतिरिक्त सीटसाठी जे शुल्क आकारले जाणार आहे ते मूळ बुकिंग रकमेच्या 25 टक्क्यांपर्यंत कमी असणार आहे. ही योजना 24 जुलैपासून लागू करण्यात येणार आहे. 


ही डबल सीट बुकिंगची योजना यात्रा वेबसाईट, इंडिगो कॉल सेंटर किंवा विमानतळांवरील काऊंटरवर उपलब्ध होणार नाही. केवळ इंडिगोच्या वेबसाईटवरूनच य़ाचा लाभ घेता येऊ शकतो. इंडिगोने 20 ते 28 जूनदरम्य़ान एक ऑनलाईन सर्व्हे केला होता. यावेळी यात्रेकरुंनी सीट चिकटून असल्याने चिंता व्यक्त केली होती. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

लेखी परीक्षा नाही! उच्च न्यायालयात नोकरीची संधी; क्लार्क पदासाठी 102 जागांवर भरती

सौदी अरेबियाचे किंग सलमान हॉस्पिटलमध्ये दाखल; वय 84 वर्षे

...तर 'ढोंगी' TikTok ला भारतात प्रवेश मिळू शकतो? चिनी कंपनीचे मोठे कारस्थान

भारत vs चिनी 'राफेल'! सामना रंगला; पहा कोण जादा शक्तीवान?

Sarkari Nokari : थेट सातवा वेतन आयोग; केंद्र सरकारने काढली पोलिसांची बंपर भरती

कुठेय मंदी! 'या' बँकेच्या संचालकाला सर्वाधिक वेतन; उदय कोटक यांचा पगार घटला

Web Title: country's largest airline GO Indigo Cuts 10 percent jobs in corona Crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.