देशातील बेरोजगारीचा दर घसरला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 11:38 AM2021-07-08T11:38:54+5:302021-07-08T11:40:05+5:30
कोविड-१९ साथीमुळे अलीकडील काळात बेरोजगारीचा दर वाढलेला होता.
नवी दिल्ली : कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले निर्बंध आणखी शिथिल करण्यात आल्यामुळे ४ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात बेरोजगारीचा दर घसरून ७.३ टक्क्यांवर आला आहे.
आदल्या सप्ताहात तो ८.७२ टक्के, तर २० जूनला संपलेल्या सप्ताहात ९.३५ टक्के होता. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ने (सीएमआयई) ही माहिती प्रसिद्ध केली आहे.
कोविड-१९ साथीमुळे अलीकडील काळात बेरोजगारीचा दर वाढलेला होता. २३ मे रोजी संपलेल्या सप्ताहात तो सर्वोच्च १४.७३ टक्क्यांवर होता.