धक्कादायक! पश्चिम बंगालमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 04:37 PM2019-10-10T16:37:07+5:302019-10-10T16:40:02+5:30

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

couple and their son brutally killed by unknown miscreants in murshidabad west bengal | धक्कादायक! पश्चिम बंगालमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

धक्कादायक! पश्चिम बंगालमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

Next
ठळक मुद्देएकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अज्ञातांनी घरात घुसून पती, गर्भवती पत्नी आणि आठ वर्षाच्या मुलाची हत्या केली.मुर्शिदाबादच्या जियागंज परिसरात ही घटना घडली.

मुर्शिदाबाद - पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अज्ञातांनी घरात घुसून पती, गर्भवती पत्नी आणि आठ वर्षाच्या मुलाची हत्या केली आहे. मुर्शिदाबादच्या जियागंज परिसरात ही घटना घडली. धारदार शस्त्रांचा वापर करून हत्या करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंधू प्रकाश पाल (35) यांची हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या सोबतच पाल यांची पत्नी आणि लहान मुलाचीही हत्या करण्यात आली आहे. बंधू प्रकाश पाल हे गोसाईंग्राममधील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. तर त्यांची पत्नी गर्भवती होती. शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडला तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला. शेजाऱ्यांनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी या तिघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडले. धारदार शस्त्रांचा वापर करून या तिघांची हत्या करण्यात आली आहे.

बंधू प्रकाश पाल हे आरएसएसचा कार्यकर्ता असल्याचा दावा आरएसएसच्या काही लोकांनी केला आहे. पश्चिम बंगालराष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चे नेते जिष्णु बसू यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंधु प्रकाश आरएसएस कार्यकर्ता होते आणि काही दिवसांपूर्वी ते 'साप्ताहिक मिलन' मध्ये सहभागी झाले होते. तसेच भाजपा प्रवक्ता संबित पात्रा यांनी ट्विट करून या घटनेमुळे आपल्याला खूप मोठा धक्का बसल्याचं सांगितलं आहे. 

'पाल हे प्राथमिक शाळेत शिक्षक होते. गेल्या 20 वर्षांपासून ते शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. मूळचे ते शाहपूर जिल्ह्याचे रहिवासी आहेत. मात्र आता मुलाच्या शिक्षणासाठी मुर्शिदाबाद येथे शिफ्ट झाले आहेत. त्याचा कोणाशी वाद होता का यासंबंधी आपल्याला काही माहिती नाही' अशी माहिती पाल यांचे भाऊ सुजॉय घोष यांनी दिली आहे. पोलीस या हत्या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 
 

Web Title: couple and their son brutally killed by unknown miscreants in murshidabad west bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.