"मम्मी, पप्पा... तुम्ही आम्हाला खूप प्रेम दिलं पण..."; जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 06:00 PM2024-04-09T18:00:08+5:302024-04-09T18:01:08+5:30

शिवानी आणि अंकुरने त्यांच्या पालकांच्या नावाने एक पत्र ठेवलं आहे.

couple ends life in bijnor wife died husband condition critical | "मम्मी, पप्पा... तुम्ही आम्हाला खूप प्रेम दिलं पण..."; जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल

फोटो - आजतक

उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये आपापसात झालेल्या वादातून पती-पत्नीने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने विषारी पदार्थ खाल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्या दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पतीची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी या जोडप्याने त्यांच्या पालकांना उद्देशून एक सुसाइड नोट ठेवली.

संपूर्ण घटना बिजनौरच्या हल्दौरमध्ये घडली, जिथे काल रात्री काही कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. त्यानंतर शिवानी शर्मा आणि तिचा पती अंकुर शर्मा यांनी विषारी पदार्थ खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान शिवानीचा मृत्यू झाला, तर अंकुर अजूनही रुग्णालयात दाखल आहे. या घटनेमुळे कुटुंबात शोककळा पसरली आहे.

शिवानी आणि अंकुरने त्यांच्या पालकांच्या नावाने एक पत्र ठेवलं आहे ज्यात लिहिलं आहे की, "मम्मी, पप्पा... तुम्ही आम्हाला खूप प्रेम दिलं आहे पण आता आमची वेळ आली आहे. आम्ही छोटासा जीव (मुलगी) तुमच्या हातात सोपवत आहोत. जेव्हा तुम्हाला हे पत्र मिळेल तेव्हा आम्ही दोघेही हे जग सोडून गेलेलो असू. आमच्या मृत्यूसाठी आम्ही स्वत:च जबाबदार आहोत." 

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुर रात्री हॉटेलमधून जेवण करून घरी आला होता. पत्नीसाठी दाल मखनी आणि इतर खाद्यपदार्थ आणले होते. मात्र रात्री दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. त्यानंतर एकाच वेळी दोघांची प्रकृती खालावली आणि त्यांना उलट्या होऊ लागल्या. या दाम्पत्याने विषारी पदार्थ खाल्ल्याचं निष्पन्न झालं.दोघांनाही तत्काळ बिजनौर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे उपचारादरम्यान शिवानीचा मृत्यू झाला. 

अंकुरची प्रकृतीही चिंताजनक आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टर सांगत आहेत. याच दरम्यान, पोलिसांनी शिवानीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. दुसरीकडे अंकुरच्या प्रकृतीसाठी कुटुंबीय प्रार्थना करत आहेत. या जोडप्याला 8 महिन्यांची मुलगी आहे.
 

Web Title: couple ends life in bijnor wife died husband condition critical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.