दिल्ली मेट्रोतला सीसीटीव्हीत रेकॉर्ड केलेला अश्लील व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 09:26 AM2019-07-30T09:26:09+5:302019-07-30T09:26:35+5:30

दिल्ली मेट्रो स्टेशनमधला एक अश्लील व्हिडीओ वाऱ्याच्या वेगानं व्हायरल होत आहे.

couple involving in an intimate act at delhi metro station video landed on a porn site | दिल्ली मेट्रोतला सीसीटीव्हीत रेकॉर्ड केलेला अश्लील व्हिडीओ व्हायरल

दिल्ली मेट्रोतला सीसीटीव्हीत रेकॉर्ड केलेला अश्लील व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

नवी दिल्लीःदिल्लीमेट्रो स्टेशनमधला एक अश्लील व्हिडीओ वाऱ्याच्या वेगानं व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मेट्रो स्टेशनवरच्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड करण्यात आला असून, तो पॉर्न वेबसाइटवरही अपलोड केला आहे. दिल्ली मेट्रोच्या सीसीटीव्ही कंट्रोल रूममधून 18 जुलैला दुपारी 2.22 वाजता हे सीसीटीव्ही फुटेज रेकॉर्ड करण्यात आलं आहे. त्यानंतर हा व्हिडीओ पॉर्न वेबसाइटवर टाकण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. डीएमआरसी या प्रकरणाचा तपास करत असून, आझादपूर पोलिसांत अज्ञात जोडप्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
डीएमआरसीचे प्रवक्ते अनुज दयाल म्हणाले, डीएमआरसीनं सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्यामुळे दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांना आम्ही सीसीटीव्ही फुटेज आणि सर्व माहिती दिली आहे. आम्ही लोकांना आवाहन करतो की मेट्रोमध्ये अशा प्रकारचं कृत्य करू नये.

हा व्हिडीओ पॉर्न साइटवर अपलोड करणाऱ्याविरोधात आम्ही कारवाई केली आहे. परंतु सीसीटीव्हीमध्ये अशा प्रकारे व्हिडीओ रेकॉर्ड करून पॉर्न साइटवर टाकल्यानं लोकांना गोपनीयतेची चिंता सतावते आहे. डीएमआरसीचे कर्मचारी आणि सुरक्षा अधिकारी कशा प्रकारे सीसीटीव्ही फुटेज हँडल करतात. सीसीटीव्ही लोकांची सुरक्षा करण्यासाठी लावण्यात आलेले असून, ते लोकांच्या गोपनीयतेचं उल्लंघन करत आहेत. 

Web Title: couple involving in an intimate act at delhi metro station video landed on a porn site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.