एकेकाळी प्रिंटिंग प्रेसचे मालक होते पती-पत्नी; आता रस्त्याच्या कडेला विकतात 'राजमा चावल'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 12:26 PM2023-04-03T12:26:31+5:302023-04-03T12:31:37+5:30
फूड ब्लॉगर जतिन सिंह यांनी सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
कोविड-19 महामारी आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनने जगभरातील जवळजवळ प्रत्येकाचे जीवन बदलले. अनेकांना नोकरीवरून काढण्यात आले, काहींना प्रचंड नुकसान झाले तर काहींना त्यांचे व्यवसाय पूर्णपणे बंद करावे लागले. अशीच एक घटना आता समोर आली आहे. फरीदाबादमधील एका जोडप्यासोबत असंच काहीस घडलं आहे. ज्यांच्याकडे आधी प्रिंटिंग प्रेस होती. पण त्यांचे लॉकडाऊन दरम्यान मोठे नुकसान झाले.
नुकसान झाल्यानंतर आता हे जोडपं फूड स्टॉल चालवत आहेत. फूड ब्लॉगर जतिन सिंह यांनी सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. क्लिपमध्ये, हे जोडपं फरीदाबादच्या गेट क्रमांक 5 जवळ ग्रीनफिल्ड कॉलनी येथे असलेल्या त्यांच्या स्टॉलवर उभे असलेले पाहिला मिळतं.
"मी एक प्रिंटिंग प्रेस चालवत असे, पण लॉकडाऊनच्या काळात प्रेस बंद पडली. नंतर, मी काही काळ काम केले, पण आमचा रोजचा खर्च भागवण्यासाठी मला जास्त पैशांची गरज होती. त्यामुळे माझी पत्नी आणि आम्हाला स्वयंपाक कसा करायचा हे माहीत असल्याने मी आमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला" असं म्हटलं आहे.
एका आठवड्यापूर्वी हा व्हिडीओ शेअर केल्यापासून, व्हिडिओला इन्स्टाग्रामवर 6 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 29 हजारपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, "हे जोडपे रस्त्यावर राजमा चावल विकत आहे." अनेक युजर्सनी या जोडप्यातं खूप कौतुक केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.