Corona : हनिमूनहून परतताच पतीला सोडून निघून गेली पत्नी, कोरोनाची लागण झाल्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 03:15 PM2020-03-14T15:15:26+5:302020-03-14T15:25:43+5:30

संबंधित महिलेचा पती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या महिलेलाही सर्वांपासून वेगळे ठेवण्यात आले होते.

couple return from honeymoon husband infected doctor collect sample of wife | Corona : हनिमूनहून परतताच पतीला सोडून निघून गेली पत्नी, कोरोनाची लागण झाल्याची शक्यता

Corona : हनिमूनहून परतताच पतीला सोडून निघून गेली पत्नी, कोरोनाची लागण झाल्याची शक्यता

Next
ठळक मुद्देइटली, ग्रीस आणि फ्रान्सला हनिमूनसाठी गेले होते हे जोडपेपतीची कोरोना टेस्ट आली होती पॉझिटिव्हविलगीकरण कक्षातून पळून गेली होती महिला

आग्रा - कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगातच दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याची प्रचिती आग्रा या शहरातही आली. पतीसह इटलीवरून हनिमूनहून बंगळुरूला परतलेली एक महिला, पती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळताच त्याला सोडून निघून गेल्याची घटना घडली आहे. 

संबंधित महिलेचा पती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या महिलेलाही सर्वांपासून वेगळे ठेवण्यात आले होते. मात्र, स्वतःचा आणि हजारो लोकांचा जीव धोक्यात घालून ही महिला विलगिकरण कक्षातून पळाली. एवढेच नाही, तर ती विमानाने दिल्ली आणि नंतर ट्रेनने थेट आग्रा येथे आपल्या माहेरी आली. हे समजल्यानंतर आरोग्य विभागाच्या भूवया उंचावल्या असून संबंधित महिलेचा ट्रॅव्हल रूटही ट्रेस केला जात आहे.

वेगळे होण्यास नकार -
या महिलेच्या पतीला कोरोनाचे निदान झाले होते. यानंतर महिलेला वेगळे करण्यात आले होते. मात्र, ही महिला 8 मार्चला बंगळुरूहून दिल्ली आणि नंतर आग्र्याला आपल्या पालकांकडे परतली. यानंतर जेव्हा आरोग्य विभागाचे अधिकारी तिच्या घरी पोहोचले, तेव्हा ती तेथे 8 सदस्यांसोबत राहत असल्याचे आढळून आले. यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी या सर्वांनाच वेगळे राहायला सांगितले. मात्र त्यांनी नकार दिला. यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलिसांना बोलवावून त्यांना वेगळे करण्यात आले.

आग्रा येथील सीएमओ मुकेश कुमार वत्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य अधिकाऱ्यांचा चमू संबंधित महिलेच्या घरी पोहोचला तेव्हा तिच्या वडिलांनी ती बंगळुरूला परत गेल्याची खोटी माहिती दिली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर तिच्या संपूर्ण कुटुंबाला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्याता आले. या महिलेला आता एसएन वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

पतीला कोरोनाची लागण झालेली असतानाही गेली माहेरी -
फेब्रुवारी महिन्यात संबंधित महिलेचा विवाह झाला होता. यानंर ही महिला आणि तिचा पती हनिमूनसाठी इटलीला गेले होते. आणि तेथून ते ग्रीस आणि फ्रान्सलाही गेले. यानंर ते 27 फेब्रुवारीला मुंबईला आले आणि येथून बंगळुरूला गेले. 7 मार्चला या महिलेच्या पतीला कोरोना झाल्याचे आढळून आले होते. यानतंर या दोघांनाही वेगळे ठेवण्यात आले होते. ही गोष्ट या महिलेने आपल्या कुटुंबीयांना सांगितली. यानंतर तिच्या वडिलांनी तिला आग्र्याला बोलावून घेतले होते.

बंगळुरूहून दिल्ली मग आग्रा -
ही महिला 8 मार्चला विमानाने बंगळुरूहून नवी दिल्लीला आणि नतंर ट्रेनने दिल्लीहून आग्र्याला पोहोचली. आता तिच्या प्रवासाचे तपशील शोधले जात आहेत. या प्रवासादरम्यान तिच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अलिगड वैद्यकीय महाविद्यालयाने संबंधित महिला संशयित असल्याचे म्हटले होते. एका डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार या महिलेचे सॅम्पल्स पुण्याच्या लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.

Web Title: couple return from honeymoon husband infected doctor collect sample of wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.